ओझरखेडला मायलेकाचा खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2017 01:45 IST2017-08-06T01:45:03+5:302017-08-06T01:45:25+5:30
दिंडोरी तालुक्यातील ओझरखेड धरणाजवळील कृष्णगाव शिवारातील शेळकेवाडीत मायलेकाचा त्यांच्या झोपडीत गळा चिरून निर्घृण खून केल्याची घटना शुक्रवारी (दि़ ४) मध्यरात्रीच्या सुमारास घडली़ सविता गोटीराम साहळे (३५) व करण गोटीराम साहळे (११) दोघेही मूळ राहणार, मोळंगी कादवा, ता़ दिंडोरी, जि़ नाशिक) अशी खून झालेल्या मायलेकाची नावे आहेत़ ग्रामीण पोलिसांकडून मारेकºयाचा शोध सुरू असून, खुनाचे कारण अद्याप समोर आलेले नाही़

ओझरखेडला मायलेकाचा खून
नाशिक : दिंडोरी तालुक्यातील ओझरखेड धरणाजवळील कृष्णगाव शिवारातील शेळकेवाडीत मायलेकाचा त्यांच्या झोपडीत गळा चिरून निर्घृण खून केल्याची घटना शुक्रवारी (दि़ ४) मध्यरात्रीच्या सुमारास घडली़ सविता गोटीराम साहळे (३५) व करण गोटीराम साहळे (११) दोघेही मूळ राहणार, मोळंगी कादवा, ता़ दिंडोरी, जि़ नाशिक) अशी खून झालेल्या मायलेकाची नावे आहेत़ ग्रामीण पोलिसांकडून मारेकºयाचा शोध सुरू असून, खुनाचे कारण अद्याप समोर आलेले नाही़
कृष्णगाव शिवारातील शेळकेवाडी येथे सविता साहळे व तिचा मुलगा करण हे दोघेच एका झोपडीवजा घरात राहत असून, पती गोटीराम साहळे यांचा सुमारे पाच वर्षांपूर्वी मृत्यू झाला आहे़ पतीच्या मृत्यूनंतर सविता ही आई-वडिलांकडेच राहत होती़ रात्री ११.३०-१२ वाजेच्या सुमारास या दोघा मायलेकांचे मृतदेह गळा चिरलेल्या अवस्थेत आढळून आले़ मयत सविता साहळे यांची एक आत्या व भाऊ हेदेखील घरापासून जवळच राहत असून, त्यांनाही या घटनेची माहिती नव्हती़दिंडोरी पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व कर्मचाºयांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केल्यानंतर रात्री दीड वाजेच्या सुमारास या दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले़ या घटनेमुळे ओझरखेडसह दिंडोरी तालुक्यात खळबळ उडाली असून, पोलिसांकडून मयत सविताच्या नातेवाइकांकडे चौकशी सुरू आहे़ दरम्यान, पोलीस संशयितांचा शोध घेत असून, या मायलेकाची हत्या कुणी व कोणत्या कारणासाठी केली, शेतजमिनीचा वा आणखी काही वाद होता का या कारणांचा शोध घेतला जातो आहे़ याप्रकरणी पोलिसांत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़