ओझरला कपड्याच्या दुकानात चोरी

By Admin | Updated: July 25, 2016 23:21 IST2016-07-25T23:21:22+5:302016-07-25T23:21:35+5:30

ओझरला कपड्याच्या दुकानात चोरी

Ozar was stolen in a clothing store | ओझरला कपड्याच्या दुकानात चोरी

ओझरला कपड्याच्या दुकानात चोरी

 ओझर टाऊनशिप : ओझर येथील एका रेडिमेड कपडाचे दुकान फोडण्यात येऊन अज्ञात चोरट्यांनी ३१ हजार १७० रूपयांचा ऐवज चोरून नेला.
काल रात्री मुंबई-आग्रा महामार्गाला समांतर असलेल्या सरवीस रोडलगतच्या मौनगिरी फॅशन या रेडिमेड कपड्याच्या दुकानाच्या नावाच्या बोर्ड मागील खिडकीचे गज कापून आज्ञात चोरट्यांनी दुकानात प्रवेश केला. दुकानातून रोख आठ हजार रुपयासह ११०० रुपये किमतीचे जीन्स पॅण्ट,शर्ट व सीसीटीव्हीचे यूनिट असा ऐकूण ३११७० रुपयांचा ऐवज चोरून नेला असल्याची तक्राररामनाथ जाधव यांनी ओझर पोलीस ठाण्यात नोंदविली.
पोलिसांनी आज्ञात चोरट्याविरूद्ध गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार रमेश जाधव हे करीत
आहेत. (वार्ताहर)

Web Title: Ozar was stolen in a clothing store

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.