ओझर टाऊनशीपला घरफोडी

By Admin | Updated: November 14, 2016 00:36 IST2016-11-14T00:23:17+5:302016-11-14T00:36:51+5:30

ओझर टाऊनशीपला घरफोडी

Ozar Townsheep burglary | ओझर टाऊनशीपला घरफोडी

ओझर टाऊनशीपला घरफोडी


ओझर टाऊनशीप : एका घरातील सर्र्वकुटुंबीय बाहेरगावी गेल्याची संधी साधून घराच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडून आज्ञात चोरट्यांनी घरातून चार हजार रुपये रोख रकमेसह सोन्या चांदीचे दागिने असा एकूण ३४ हजार पाचशे रुपयांचा ऐवज चोरून नेला.
प्रिया गडाख, राहणार आनंदनगर, ओझर या सहकुटुंब बाहेरगावी गेल्या असताना त्यांच्या घराचा लोखंडी दरवाजा उघडून मुख्य दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश केला. बेडरूममधील लोखंडी पलंगात पिशवीत ठेवलेले चार हजार रुपये रोख व सोन्या-चांदीचे दागिने असा एकूण ३४ हजार पाचशे रुपयांचा ऐवज चोरून नेला असल्याची तक्रार प्रिया गडाख यांनी आज पोलिसांत दिली. अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल केला असून, अधिक तपास पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. (वार्ताहर)

Web Title: Ozar Townsheep burglary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.