ओझरटाऊनशिप : ओझरसह परिसरातील उपनगरामध्ये डासांच्या प्रमाणात मोठी वाढ झाली असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने साथीच्या रोगाचा प्रसार होऊ शकतो, त्यामुळे सार्वजनिक आरोग्य अबाधित राखण्यासाठी डास निर्मूलन योजना राबवावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.ओझरसह परिसरात कोरोनाचे रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. त्या पार्श्वभूमीवर कोरोना विषाणूचा प्रतिबंध करण्यासाठी जनजागृती केली जात असतानाच ओझर गावासह भोवती वसलेल्या विविध उपनगरात गेल्या दोन महिन्यांपासून डासाचे प्रमाण वाढले आहे. त्यातच उन्हाळा सुरू झाल्याने तापमानात रोज वाढ होत आहे. दोन ते तीन महिन्यांपूर्वी डास निर्मूलनासाठी फवारणी करण्यात आली होती. त्या नंतर मात्र फवारणी झाली नसल्याचे नागरिकांनी सांगितले.
ओझरला डासांच्या उपद्रवाने नागरिक त्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2021 01:22 IST
ओझरटाऊनशिप : ओझरसह परिसरातील उपनगरामध्ये डासांच्या प्रमाणात मोठी वाढ झाली असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने साथीच्या रोगाचा प्रसार होऊ शकतो, त्यामुळे सार्वजनिक आरोग्य अबाधित राखण्यासाठी डास निर्मूलन योजना राबवावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
ओझरला डासांच्या उपद्रवाने नागरिक त्रस्त
ठळक मुद्देओझरसह परिसरात कोरोनाचे रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ