ओझरला ३४ कोरोना बाधित रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2021 07:25 PM2021-03-27T19:25:01+5:302021-03-27T19:25:33+5:30

ओझरटाऊनशिप : ओझर व परिसरात कोरोनाचा कहर सुरूच असुन शनिवारी ३४ रुग्ण कोरोना बाधित आढळल्याने परिसरातील आता पर्यत कोरोना बाधित रुग्ण संख्या १६९१ झाली आहे. पैकी ३४ जणांचा म्रुत्यू झाला असुन १३१६ रुग्ण बरे झाले आहेत तर ३४१ रुग्णावर उपचार सुरू आहे.

Ozar has 34 corona patients | ओझरला ३४ कोरोना बाधित रुग्ण

ओझरला ३४ कोरोना बाधित रुग्ण

Next
ठळक मुद्देकोरोनाचे रुग्ण संख्येत पुन्हा झपाट्याने वाढ होत आहे,

ओझरटाऊनशिप : ओझर व परिसरात कोरोनाचा कहर सुरूच असुन शनिवारी ३४ रुग्ण कोरोना बाधित आढळल्याने परिसरातील आता पर्यत कोरोना बाधित रुग्ण संख्या १६९१ झाली आहे. पैकी ३४ जणांचा म्रुत्यू झाला असुन १३१६ रुग्ण बरे झाले आहेत तर ३४१ रुग्णावर उपचार सुरू आहे.

ओझर परिसरात सलग तिस दिवसापासून रोज बाधित रुग्ण आढळत असल्यामुळे कोरोनाचे रुग्ण संख्येत पुन्हा झपाट्याने वाढ होत आहे, त्यामुळे नागरिक भयभीत झाले आहेत.
ओझर सह परिसरातील ३४ रुग्णाचा अहवाल कोरोना बाधित असल्याचा प्राप्त झाला आहे. त्यामध्ये ओझरटाऊनशिप ८, मेनरोड १, तांबटलेन १, कासारलेन २, जिव्हाळे ४, दिक्षी १, टिळक नगर १, जाधव वस्ती २, भडके वस्ती १, शिवाजी नगर ४, साई धाम १, दहावा मैल १, मिलिंद नगर २, नारखेडे चाळ १, तानाजी चौक १, सोनेवाडी १ व दात्याने येथील २ रुग्णांचा समावेश आहे.

ओझर परिसरामध्ये सलग तीस दिवसापासून वाढत्या संख्येने रुग्ण आढळत असल्याने व लसीकरणाचे ही काम सुरू असल्यामुळे आरोग्य विभागाची दमछाक होत आहे नागरिकांनी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी काळजी घ्यावी कोरोना नियमांचे पालन करावे असे आवाहन वैद्यकीय अधिकारी डॉ. वैशाली कदम, डॉ. अक्षय तारगे, आरोग्य सहाय्यक अनिल राठी यांनी केले आहे.

Web Title: Ozar has 34 corona patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.