ओझरला चोरट्यांचा सुळसुळाट
By Admin | Updated: July 24, 2014 01:01 IST2014-07-23T23:19:21+5:302014-07-24T01:01:46+5:30
ओझरला चोरट्यांचा सुळसुळाट

ओझरला चोरट्यांचा सुळसुळाट
ओझर : येथे एकाच रात्रीतून तीन चोरीच्या घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून, पोलिसांनी गस्त वाढविण्याची मागणी होत आहे.
गावातील बाजारपेठेत असलेल्या पशुवैद्यकीय दवाखान्यातून टीव्ही संच, ड्रिल मशीन तसेच काही वैद्यकीय टुल्स चोरीला गेल्याची घटना घडली. मुंबई-आग्रा महामार्गालगत असलेल्या जिल्हा परिषदेच्या मुलांची शाळा असून, येथून शालेय पोषण आहार ठेवलेल्या बचतगटाच्या दोन्ही खोल्या फोडून त्यातील दोन गॅसच्या शेगड्या, सिलिंडर व काही भांडी चोरीला गेली आहेत. पंधरा दिवसांपूर्वी याच शाळेतून साहित्य चोरीला गेल्याची घटना घडली होती.
चोरीची तिसरी घटना मेनरोडवरील जैन स्थानकात घडली असून, मंदिराची दानपेटीसह रक्कम चोरून नेली. श्री स्वामी समर्थ केंद्रालगत असलेल्या पाटील चाळीत बाहेर लावलेली दुचाकी चोरीला गेली आहे. एकाच रात्रीत सदरच्या तिन्ही घटना घडल्या आहेत. याप्रकरण पोलिसांत अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून, पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी, अशी मागणी होत आहे. (वाता्हर)