राज्यातील वजनदार मंत्र्यांच्या जिल्ह्यात ऑक्सिजनचा पुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:18 IST2021-04-30T04:18:38+5:302021-04-30T04:18:38+5:30

नाशिकमधील वाढत्या कोरोना स्थितीबाबत महाजन यांनी बुधवारी (दि. २८) शहरात दौरा केला. बिटको रुग्णालयातील उपचार आणि उणिवांबरोबरच गेल्या २१ ...

Oxygen supply to the weighty ministerial district of the state | राज्यातील वजनदार मंत्र्यांच्या जिल्ह्यात ऑक्सिजनचा पुरवठा

राज्यातील वजनदार मंत्र्यांच्या जिल्ह्यात ऑक्सिजनचा पुरवठा

नाशिकमधील वाढत्या कोरोना स्थितीबाबत महाजन यांनी बुधवारी (दि. २८) शहरात दौरा केला. बिटको रुग्णालयातील उपचार आणि उणिवांबरोबरच गेल्या २१ एप्रिल राेजी महापालिकेच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजन गळतीची दुर्घटना घडली होती. त्याचीही त्यांनी माहिती घेतली.

केंद्र शासनाकडून राज्य सरकारला मदत दिली जाते. मात्र, राज्य सरकारचे कोणतेही नियोजन नसून कोरोना नियंत्रणात आणण्यात हे सरकार अयशस्वी ठरल्याचा दावा महाजन यांनी केला. राज्यात ठाणे आणि पुणे जिल्ह्याला वेगळा तर अन्य जिल्ह्यांना वेगळा न्याय दिला जातो. राज्यात हाहाकार सुरू आहे. सरकार केवळ बैठकाच घेत असून विरोधी पक्षांचे नेते राज्यभर फिरत असल्याचा आरोप त्यांनी केला. केंद्र शासनाने लसींचे डोस उपलब्ध करून दिले आणि रेमडेसिविर खरेदीचे अधिकार दिले. त्यानंतर आता राज्य सरकार ग्लोबल निविदा काढत असून हे भरकटलेले सरकार असल्याचा आरोप त्यांनी केला.

नाशिकमध्ये देखील रेमडेसिविर आणि ऑक्सिजनची समस्या असून यासंदर्भात महापालिका आयुक्त तसेच जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली. अत्यंत अल्प पुरवठ्यामुळे तेही हतबल आहेत. पालकमंत्री म्हणतात, मी हेल्पलेस आहे, मग नागरिकांनी कोेणाकडे जायचे, असा प्रश्न त्यांनी केला.

इन्फाे..

खडसे यांंचा तोल गेला

माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्याशी एका लहान मुलाच्या संभाषणाची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली असून, त्यात खडसे यांनी महाजन यांच्यासंदर्भात काही वादग्रस्त विधाने केली आहेत. त्यावर बोलताना खडसे यांनी शाळकरी मुलासमवेत बाेलताना खडसे यांची जीभ घसरली आहे. एकेकाळी मुख्यमंत्री पदाचे दावेदार असलेल्या खडसे यांचा तोल जातोय, त्यांना मानसोपचार तज्ज्ञांकडे नेऊन मलाच त्यांचा इलाज करावा लागेल, असे ते म्हणाले.

Web Title: Oxygen supply to the weighty ministerial district of the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.