देवळा कोरोना सेंटरला ऑक्सीजन मशीन भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 06:56 PM2021-04-20T18:56:42+5:302021-04-20T19:02:44+5:30

देवळा : तालुक्यात ऑक्सीजन अभावी कोरोना रुग्णांची होणारी गैरसोय पाहून तालुक्यातील पोल्ट्री व्यावसायिकांनी ऑक्सीजन कॉन्सट्रेटर मशीन देवळा येथील कोविड सेंटरला भेट दिले.

Oxygen machine visit to Deola Corona Center | देवळा कोरोना सेंटरला ऑक्सीजन मशीन भेट

तहसिलदार दत्तात्रेय शेजुळ, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुभाष मांडगे आदींकडे ऑक्सीजन मशीन सुपुर्द करतांना पोल्ट्री व्यावसायिक मनोज कापसे, व मनोहर धोंडगे.

Next
ठळक मुद्देऑक्सीजन मशीनमुळे रुग्णांबरोबरच आरोग्य विभागाला देखील दिलासा

देवळा : तालुक्यात ऑक्सीजन अभावी कोरोना रुग्णांची होणारी गैरसोय पाहून तालुक्यातील पोल्ट्री व्यावसायिकांनी ऑक्सीजन कॉन्सट्रेटर मशीन देवळा येथील कोविड सेंटरला भेट दिले.

देवळा तालुक्यातील कोरोना रुग्णांना सेवा देत असतांना आरोग्य विभागाचे कर्मचारी मोठ्या संख्येने कोरोना बाधित झाल्यामुळे त्यांना होम कोरोंटाईन करण्यात आले आहे. यामुळे आरोग्य यंत्रणेवरील ताण वाढला आहे, त्यातच पुरेशा प्रमाणात ऑक्सीजन उपलब्ध होत नसल्यामुळे चिंतेत भरच पडली आहे.
ऑक्सीजनची गरज लक्षात घेउन देवळा तालुक्यातील पोल्ट्री उद्योजक मनोज कापसे व मनोहर धोंडगे यांनी स्वखर्चाने ऑक्सिजन मशीन मागवले.

मंगळवारी (दि.२०) ऑक्सीजन मशीन त्यांनी सुपुर्द केले. प्रति मिनिट पाच लिटर ऑक्सीजन निर्मितीची क्षमता असलेल्या ह्या मशीनमध्येच ऑक्सीजन तयार होतो. श्वास घेण्यास त्रास होणाऱ्या कोरोना रुग्णांना ऑक्सीजन बेड उपलब्ध होईपर्यंत ह्या ऑक्सीजन मशीनमुळे रुग्णांबरोबरच आरोग्य विभागाला देखील दिलासा मिळाला आहे.

 

Web Title: Oxygen machine visit to Deola Corona Center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.