मालेगावी खासगी रुग्णालयांना ऑक्सिजन सिलिंडर उपलब्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 04:15 IST2021-05-06T04:15:10+5:302021-05-06T04:15:10+5:30

येथील ऑक्सिजन सिलिंडर डिस्टिब्युटर्स भरत मेहता यांच्या सहकार्याने अलंग भावनगर (गुजरात) येथून दररोज दीडशे सिलिंडर उपलब्ध होत आहेत. दर ...

Oxygen cylinders available to private hospitals in Malegaon | मालेगावी खासगी रुग्णालयांना ऑक्सिजन सिलिंडर उपलब्ध

मालेगावी खासगी रुग्णालयांना ऑक्सिजन सिलिंडर उपलब्ध

येथील ऑक्सिजन सिलिंडर डिस्टिब्युटर्स भरत मेहता यांच्या सहकार्याने अलंग भावनगर (गुजरात) येथून दररोज दीडशे सिलिंडर उपलब्ध होत आहेत. दर तीन दिवसाआड हे ऑक्सिजन सिलिंडर उपलब्ध होत आहेत. सोमवारी पहिली खेप आली होती, तर मंगळवारी दीडशे ऑक्सिजन सिलिंडरची गाडी मालेगावी दाखल झाली आहे. यावेळी भाजपचे गटनेते गायकवाड, भाजपचे उत्तर महाराष्ट्र व्यापारी आघाडीचे अध्यक्ष नितीन पोफळे, दीपक गायकवाड, राजेंद्र शेलार, विजय भावसार, विजय एन्थॉल यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी स्वागत केले. सदर ऑक्सिजन सिलिंडर ज्या रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण होईल त्या ठिकाणी तातडीने उपलब्ध करून दिले जाणार असल्याची माहिती नगरसेवक गायकवाड यांनी दिली.

===Photopath===

050521\05nsk_10_05052021_13.jpg

===Caption===

मालेगावी सटाणानाका भागात दाखल झालेल्या ऑक्सिजन सिलेंडर गाडीचे स्वागत करताना भाजपाचे गटनेते सुनिल गायकवाड, नितीन पोफळे, दिपक गायकवाड, राजेंद्र शेलार, विजय भावसार, विजय एन्थॉल आदि.

Web Title: Oxygen cylinders available to private hospitals in Malegaon