कळवण रुग्णालयास बाजार समितीकडून ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:11 IST2021-06-01T04:11:33+5:302021-06-01T04:11:33+5:30
आमदार नितीन पवार यांच्या हस्ते कळवण बाजार समितीचे सभापती धनंजय पवार यांच्या उपस्थितीत उपजिल्हा रुग्णालय कोविड सेंटरचे प्रमुख डॉ. ...

कळवण रुग्णालयास बाजार समितीकडून ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर
आमदार नितीन पवार यांच्या हस्ते कळवण बाजार समितीचे सभापती धनंजय पवार यांच्या उपस्थितीत उपजिल्हा रुग्णालय कोविड सेंटरचे प्रमुख डॉ. प्रल्हाद चव्हाण यांच्याकडे हे ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर सुपुर्द करण्यात आले.
यावेळी आमदार नितीन पवार यांनी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभाग नियोजन करीत असल्याचे सांगितले.
आमदार नितीन पवार यांनी तालुक्यातील संस्था, संघटना यांना कोविड सेंटरला मदत करण्याचे आवाहन केले होते. त्याला प्रतिसाद देऊन कोरोना रुग्णांची ऑक्सिजनसाठी होत असलेली परवड लक्षात घेता कळवण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने कळवण कोविड केअर सेंटरला सहा ऑक्सिजन मशीन उपलब्ध करून देण्यात आल्याचे बाजार समितीचे सभापती धनंजय पवार यांनी यावेळी सांगितले. याप्रसंगी कळवणचे तहसीलदार बी. ए. कापसे, डॉ.संजय बंगाळ, शोभा निकम, राजेंद्र भामरे, विष्णू बोरसे, डी.एम. गायकवाड, ज्ञानदेव पवार, सुनील देवरे, साहेबराव पाटील, हेमंत बोरसे, बाळासाहेब वराडे, भूषण पगार आदी उपस्थित हाेते. सूत्रसंचलन व आभार प्रदर्शन सचिव रवींद्र हिरे यांनी केले.
फोटो - ३१कळवण बाजार समिती
कळवण बाजार समितीकडून कोविड सेंटरला ६ ऑक्सिजन कॉन्सट्रेटर सुपुर्द करतांना आमदार नितीन पवार, धनंजय पवार, डॉ प्रल्हाद चव्हाण, हेमंत बोरसे, राजेंद्र भामरे, भूषण पगार, शंकरराव निकम आदी.
===Photopath===
310521\31nsk_34_31052021_13.jpg
===Caption===
फोटो - ३१कळवण बाजार समिती कळवण बाजार समितीकडून कोविड सेंटरला ६ ऑक्सिजन कॉन्सट्रेटर सुपुर्द करतांना आमदार नितीन पवार, धनंजय पवार, डॉ प्रल्हाद चव्हाण, हेमंत बोरसे, राजेंद्र भामरे, भूषण पगार, शंकरराव निकम आदी.