घुबडाच्या पिलाचे प्राण वाचले.
By Admin | Updated: November 17, 2014 01:06 IST2014-11-17T01:05:40+5:302014-11-17T01:06:06+5:30
घुबडाच्या पिलाचे प्राण वाचले.

घुबडाच्या पिलाचे प्राण वाचले.
इंदिरानगर : सर्वसामान्य माणसाचे पक्षीप्रेम जागृत झाले आणि घुबडाच्या पिलाचे प्राण वाचले.
शुक्रवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास किरण परदेशी आपल्या दुचाकीवरून गजानन महाराज रस्त्यावरून जात होते. त्याचवेळी पाच ते सहा कावळे हे गजानन महाराज मंदिरालगत असलेल्या पावसाळी नाल्यात एका पक्ष्यावर हल्ला करीत असताना त्यांनी पाहिले. परदेशी यांनी तातडीने वाहन थांबवून कावळ्यांना हाकलून लावून पावसाळी नाल्यातून घुबडाच्या पिलास वर काढले. त्याचे कापडाने अंग पुसले व पाणीही पाजले. दुचाकीवर बसवून त्या पिलाला त्यांनी चार्वाक चौकातील नारळाच्या झाडावर सोडून दिले आणि त्याचे प्राणही वाचविले. (वार्ताहर)