लोकमत न्यूज नेटवर्कओझरटाउनशिप : एका बंद घराच्या मुख्य दरवाजाचे इंटरलॉक तोडून दरवाजा उघडून अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश करून बेडरूममधील लाकडी कपाटात ठेवलेले पाच हजार रुपये रोख व सोन्याचे दागिने असा एकूण ३२ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला असल्याची घटना दुपारी ओझर येथे घडली.काल दुपारी सव्वातीन वाजेच्या सुमारास हरिश्चंद्र बाबूराव क्षीरसागर राहणार बालाजी प्राइड, पंचवडनगर, ओझर हे घर बंद करून बाहेर गेले असताना त्यांच्या घराचे दरवाजाचे इंटरलॉक तोडून दरवाजा उघडून अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश करून बेडरूममधील कपाटात ठेवलेले पाच हजार रुपये रोख व सोन्याचे दागिने असा एकूण ३२ हजार रु पयांचा ऐवज चोरून नेला असल्याची तक्रार नोंदविल्यावरून घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे.अधिक तपास सहाय्यक पोलिस उपनिरिक्षक बी. आर. बैरागी करीत आहेत
ओझरला भरदिवसा घरफोडी
By admin | Updated: July 5, 2017 00:25 IST