ओव्हरलोड वाहतूक; आरटीओला निवेदन
By Admin | Updated: June 19, 2017 01:36 IST2017-06-19T01:36:19+5:302017-06-19T01:36:36+5:30
ओव्हरलोड वाहतूक; आरटीओला निवेदन

ओव्हरलोड वाहतूक; आरटीओला निवेदन
नाशिक : अवैधपणे होणारी ओव्हरलोड वाहतूक त्वरित बंद करावी, अशी मागणी वाळू वाहतूकदार संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत प्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले असून, कारवाई न झाल्यास थेट न्यायालयात जाण्याचाही इशारा यावेळी देण्यात आला. वाहनांच्या क्षमतेपेक्षा अधिक क्षमतेने वाहतुकीवर सर्वोच्च न्यायालयानेच एका आदेशाने निर्बंध घातले आहेत. तरीही ओव्हरलोड होणाऱ्या वाहतुकीकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप करत वाळू वाहतूकदार संघटनेने ही वाहतूक त्वरित थांबविण्याचा आग्रह धरला आहे.