संपाने महसूल विभाग ठप्प

By Admin | Updated: August 2, 2014 01:24 IST2014-08-01T23:31:09+5:302014-08-02T01:24:22+5:30

संपाने महसूल विभाग ठप्प

Overall revenue department jam | संपाने महसूल विभाग ठप्प

संपाने महसूल विभाग ठप्प

नाशिक : राज्य सरकारकडे प्रलंबित असलेल्या मागण्यांची तड लावण्यासाठी महसूल कर्मचारी संघटनेने दिलेल्या आदेशावरून शुक्रवारपासून महसूल कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारल्याने महसूल विभागाचे कामकाज ठप्प झाले. या संपात वाहनचालक, शिपाईदेखील सहभागी झाल्याने अधिकारीवर्गाला त्याचा फटका सहन करावा लागला.
महसूल कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत आजवर अनेक वेळा आंदोलने करण्यात आली. १४ जुलै रोजी कर्मचाऱ्यांनी लेखणी बंद आंदोलन करून शासनाचे लक्ष वेधले; परंतु त्याचा उपयोग होऊ शकला नाही. त्यामुळे राज्य महसूल कर्मचारी संघटनेने १ आॅगस्टपासून बेमुदत संपाची हाक दिली. त्यानुसार शुक्रवारी सर्वच कर्मचारी संपात सहभागी झाले. शिपाई व वाहनचालकही त्यात सहभागी झाल्यामुळे सकाळी कार्यालय उघडण्यासाठीदेखील अडचणी आल्या, तर अधिकारीवर्गाला कार्यालय गाठण्यासाठी स्वत:च वाहन चालवावे लागले. त्यामुळे शुक्रवारी अधिकारी उपस्थित असले, तरी कर्मचारीच नसल्याने कोणतेही कामकाज होऊ शकले नाही. परिणामी शासकीय कामकाजासाठी आलेल्या नागरिकांची त्यामुळे गैरसोय झाली. या संपात तलाठी, मंडल अधिकारी व कालबद्ध पदोन्नती मिळालेले नायब तहसीलदार मात्र सहभागी नव्हते.

Web Title: Overall revenue department jam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.