शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
3
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
4
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
5
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
6
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
7
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
8
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
9
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
10
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
11
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
12
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
13
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
14
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
15
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
16
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
17
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
18
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
19
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
20
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर

तब्बल अडीच लाख रुग्णांनी  केली कोरोनावर मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2021 01:05 IST

जिल्ह्यातील कोरोनावाढीचा वेग प्रचंड असला तरी कोरोनामुक्त होण्याच्या दरातदेखील जिल्ह्यात अनुकूल वाढ होऊ लागली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात एकूण अडीच लाख रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तसेच जिल्ह्यातील रुग्ण कोरोनामुक्त होण्याच्या दरात अल्पशी वाढ होऊ लागली असून, हीच त्यातल्या त्यात समाधानकारक बाब आहे.

ठळक मुद्देदिलासा : जिल्ह्याचा कोरोनामुक्तचा दर पुन्हा ८३ टक्क्यांकडे

नाशिक : जिल्ह्यातील कोरोनावाढीचा वेग प्रचंड असला तरी कोरोनामुक्त होण्याच्या दरातदेखील जिल्ह्यात अनुकूल वाढ होऊ लागली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात एकूण अडीच लाख रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तसेच जिल्ह्यातील रुग्ण कोरोनामुक्त होण्याच्या दरात अल्पशी वाढ होऊ लागली असून, हीच त्यातल्या त्यात समाधानकारक बाब आहे.कोरोना सर्वाधिक थैमान घालत असलेल्या जिल्ह्यांमध्ये नाशिकचा समावेश आहे. मात्र, अशा परिस्थितीतही कोरोनातून बरे होणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी आहे. जिल्ह्यात शंभर बाधितांपैकी किमान ८३ बाधित रुग्ण कोरोनामुक्त  होऊन आपापल्या  घरी परतत आहेत. त्यामुळे कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण अधिकाधिक वाढवण्यावर भर देण्याकडेच सर्वांचे लक्ष लागलेले आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील कोरोनाबाधित संख्या ३ लाखांवर गेली असली तरी त्यातील  दोन लाख ५२ हजार ११२ कोरोनाबाधितांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.  सद्य:स्थितीत ४८ हजार ५७१ रुग्णांवर उपचार सुरू असून, आत्तापर्यंत तीन हजार ३३१  रुग्णांचा मृत्यू झाला आहे.  जिल्ह्यात सर्वाधिक उपचारार्थी नाशिक शहरातनाशिक ग्रामीणमध्ये नाशिक एक हजार ६२९, चांदवड एक हजार ७७५, सिन्नर एक हजार ८२२, दिंडोरी एक हजार ६०६, निफाड तीन हजार ५१३, देवळा एक हजार ११०, नांदगाव ९२४, येवला ७०४, त्र्यंबकेश्वर ४५०, सुरगाणा ३८२, पेठ १९७, कळवण ८४७,  बागलाण एक हजार ६९२, इगतपुरी ३७३, मालेगाव ग्रामीण ७३६  असे एकूण १७  हजार ७६० पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार आहे. तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात २८ हजार १२, मालेगाव महानगरपालिका क्षेत्रात एक हजार ७१८, तर जिल्ह्याबाहेरील २१४  असे एकूण ४७  हजार ७०४  रुग्णांवर उपचार सुरू आहेत तसेच आजपर्यंत जिल्ह्यात तीन लाखावर  रुग्ण आढळून आले आहेत.

जिल्ह्यातील रुग्ण कोरोनामुक्त होण्याची टक्केवारी वाढतेयn    जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी  नाशिक ग्रामीणमध्ये ८१.४५  टक्के, नाशिक शहरात ८३.५९ टक्के, मालेगावमध्ये  ८२.२६  टक्के, तर जिल्हाबाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ९२.२५ टक्के आहे तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ८२.९३  इतके आहे. n    रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८१ टक्क्यांपर्यंत घसरून आता थोडेसे वर जाऊ लागले असून, हीच त्यातल्या त्यात जमेची बाजू आहे. जिल्ह्यातील दोन लाख  ५२  हजार ११२ कोरोनाबाधितांना डिस्चार्ज देण्यात आला असून,  सद्य:स्थितीत ४८ हजार ५७१ रुग्णांवर उपचार सुरू असून, आत्तापर्यंत तीन हजार ३३१  रुग्णांचा मृत्यू झाला आहे.  

टॅग्स :Nashikनाशिकcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या