शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात बारा हजारांहून अधिक बालके कुपोषित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2019 00:52 IST

पावसाळा सुरू होताच कुपोषणाचे वाढते प्रमाण लक्षात घेता, जिल्ह्यात कुपोषित बालकांचा शोध घेण्यास सुरुवात झाली असून, आरोग्य विभागाने केलेल्या तपासणीतून १२ हजार ६९९ बालके कुपोषित असल्याचे आढळून आले आहे.

नाशिक : पावसाळा सुरू होताच कुपोषणाचे वाढते प्रमाण लक्षात घेता, जिल्ह्यात कुपोषित बालकांचा शोध घेण्यास सुरुवात झाली असून, आरोग्य विभागाने केलेल्या तपासणीतून १२ हजार ६९९ बालके कुपोषित असल्याचे आढळून आले आहे. त्यात २ हजार ८९३ बालके अतितीव्र कुपोषित म्हणून आढळून आले, तर ९ हजार ८०६ बालके मध्यम कुपोषित आहेत. या बालकांना ग्राम बालविकास केंद्रांमध्ये दाखल करून पोेषण आहार व वैद्यकीय उपचार केला जात आहे. त्यासाठी ग्रामपंचायतींकडून सुमारे २५ लाखांचा निधी वर्ग करण्यात आला आहे.जिल्ह्यातील आठ तालुके आदिवासी असून, प्रामुख्याने या तालुक्यांमध्येच कुपोषणाचे प्रमाण आढळून येत असले तरी, आता मोठ्या प्रमाणात आदिवासींचे अन्यत्र स्थलांतर होऊ लागल्याने अन्य तालुक्यांमध्येही त्याचे प्रमाण दिसू लागले आहे. गेल्या महिन्यातच यासंदर्भात गावोगावी आरोग्य विभागाच्या वतीने बालकांची आरोग्य तपासणी करण्यात येऊन कुपोषित बालकांचा शोध घेण्यात आला. त्यानुसार जिल्ह्यात तीन लाख ८५ हजार ३५९ बालकांची तपासणी करण्यात येऊन त्यातील अतितीव्र कुपोषित व मध्यम कुपोषित बालकांची वर्गवारी करण्यात आली. त्यात १२ हजार ६९९ बालके कुपोषित आढळली आहेत. या बालकांना पोषण आहार व आरोग्य उपचार करून त्यांना सदृढ करण्यासाठी गावोगावी ग्राम बालविकास केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. या ग्रामविकास केंद्रांमध्ये दिवसभर कुपोषित बालकांना दाखल करून त्यांना दिवसातून सहा वेळा पोेषक आहार व वैद्यकीय उपचार केले जातात. एकात्मिक बालविकास विभागामार्फत ही केंद्रे चालविली जात असली तरी, कुपोषित बालकांसाठी येणारा खर्च पाहता त्याची तजवीज त्या त्या गावातील ग्रामपंचायतीच्या निधीतून करण्याची तरतूद आहे. एका बालकामागे महिन्याला २ हजार १५० रुपये खर्च येत असल्याने जिल्ह्यातील २ हजार ५९९ ग्राम विकास केंद्रांमध्ये दाखल असलेल्या १० हजार ७०९ कुपोषित बालकांसाठी २५ लाख ७०० रुपयांचा निधी वर्ग करण्यात आला आहे. उर्वरित सुमारे दोन हजार बालकांना त्यांच्या घरीच पोषण आहार व वैद्यकीय उपचार केला जात आहे. ग्राम बालविकास केंद्रात दाखल असलेल्या अतितीव्र कुपोषित बालकांचे मध्यम कुपोषित बालकात वर्गवारी होईपर्यंत या बालकांना दररोज सकाळी ८ वाजता दाखल केले जाते व सायंकाळी ५ वाजता पालकांच्या स्वाधीन केले जाते. साधारणत: पावसाळ्याच्या तीन महिन्यांपर्यंत ही ग्राम विकास केंद्रे कार्यरत राहणार आहेत.नाशकात ८८६ बालके कुपोषितमुंबई, पुण्याशी स्पर्धा करणाऱ्या नाशिक महानगरपालिका हद्दीतही कुपोषित बालके आढळली आहेत. शहरातील १८ हजार २१२ बालकांची आरोग्य तपासणी करण्यात आली असता, त्यात १५२ बालके अतितीव्र कुपोषित म्हणून, तर ७३४ बालके मध्यम कुपोषित आहेत. या बालकांसाठी १६४ ग्राम बालविकास केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. त्यात ७५५ बालके दाखल करण्यात आली आहेत.

टॅग्स :Nashikनाशिक