शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करण्याला फडणवीस,अजित पवारांचा विरोध होता"
2
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
3
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
4
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
5
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
6
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
7
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
8
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
9
'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष
10
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास
11
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
12
'सिंघम 3' च्या सेटवरुन अजय देवगण-जॅकी श्रॉफचा फाईट सीन लीक, व्हिडीओ व्हायरल
13
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
14
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
15
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
16
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
17
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
18
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
19
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
20
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 

उद्रेक : पाच कोटींचा निधी मिळूनही हद्दवाढीतील गावे विकासापासून वंचित

By admin | Published: July 25, 2014 9:59 PM

संतप्त नागरिकांकडून महापालिकेत तोडफोड

मालेगाव : येथील महानगरपालिकेच्या हद्दवाढ झालेल्या भागासाठी पाच कोटी रुपयांची विकासकामे मंजूर होऊन एक वर्ष झाले तरी त्या कामांची साधी निविदा प्रक्रियादेखील मनपा प्रशासनाने राबविली नाही. परिणामी मुख्यमंत्र्यांकडून नवीन दोन कोटी रुपयांचा विकासनिधी देण्यास वित्त विभागाने नकार दिला. त्यामुळे संतप्त झालेले आमदार दादा भुसे, हद्दवाढीतील सर्वपक्षीय नगरसेवक व नागरिकांनी आयुक्त कार्यालया-लगतच्या सभागृहाची तोडफोड केली.दुपारी आमदार भुुसे यांच्या नेतृत्वाखाली हद्दवाढ भागातील सर्वपक्षीय नगरसेवक, शिवसेना पदाधिकारी व नागरिकांचे शिष्टमंडळ मनपा आयुक्त कार्यालयात पोहोचले. तेथे सभागृहात बैठकीस प्रारंभ झाला. आयुक्त मुंबई येथे बैठकीसाठी गेल्यामुळे त्यांच्या जागेवर मनपा उपायुक्त राजेंद्र फातले व बांधकाम अभियंता कैलास बच्छाव यांनी शिष्टमंडळाशी चर्चेस प्रारंभ केला. हद्दवाढीतील नागरिकांनी गेल्या तीन वर्षात जकात, एलबीटी, पारगमन शुल्क (एस्कॉर्ट), गृहकर यांच्या माध्यमातून मनपास १०० कोटींहून अधिक उत्पन्न मिळवून दिले. मात्र त्याच भागासाठी पाच कोटी रुपयांची विकासकामे मंजूर होऊन वर्ष झाले तरीही मनपा प्रशासनाने या कामांची निविदादेखील काढलेली नाही. गेल्या वर्षभरापासून पाठपुरावा केल्यानंतर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मालेगावच्या हद्दवाढ भागासाठी दोन ते तीन कोटी रुपये देण्याची शिफारस वित्त विभागाकडे केली होती. मात्र वित्त विभागाने आधी दिलेल्या निधीतून विकासकामे झाली नसल्याचे कारण देत नवीन निधी देण्यास नकार दिला. मनपा प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळेच हद्दवाढ भागातील विकासकामे रखडल्याचा व वाढीव निधी मिळू न शकल्याचा आरोप आमदार भुसे यांनी केला. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे हद्दवाढ भागातील नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. या भागात पक्के रस्ते व गटारीची सोय नसल्यामुळे पाऊस झाल्यानंतर चिखल होऊन नागरिकांना घरातून बाहेर पडणे मुश्कील होते. विद्यार्थी, महिला व वृद्ध व्यक्ती चिखलात पडून जखमी होतात. पावसाचे पाणी थेट नागरिकांच्या घरात जाते. या भागात बहुसंख्य ठिकाणी महिलांसाठी सार्वजनिक शौचालये नाहीत. पथदीप नाहीत. पाणीपुरवठाही जुन्या योजनांद्वारेच होत आहे. मनपात समावेश केल्यानंतर चार ते सहापट गृहकर व पाणीपट्टीत वाढ होऊन या भागातील नागरिकांची आर्थिक लूट केली जात आहे. त्या तुलनेत सोयीसुविधा नाहीत. त्यामुुळे मनपाच्या हद्दवाढ भागासाठी फायदा काय, असा सवाल या भागातील सर्वपक्षीय नगरसेवक व नागरिकांनी या बैठकीत केला. मनपा अधिकाऱ्यांनी निवडणूक आचारसंहिता होती. यासह काही तांत्रिक कारणे पुढे केली. ती शिष्टमंडळाने मान्य केली नाहीत. आता पुन्हा पुढील महिन्यात विधानसभेची आचारसंहिंता लागू होईल. त्यामुळे प्राथमिक व मूलभूत सोयीसुविधांसाठी करदात्या नागरिकांनी मनपा प्रशासनाकडे किती दिवस भीक मागायची, असा सवाल भुसे यांनी केला. जर मनपा प्रशासन हद्दवाढ भागावर असाच अन्याय करत असेल तर आम्हाला मनपा नको, अशी भूमिका मांडली. त्यास उपस्थित नगरसेवक व नागरिकांनी टाळ्या वाजवून संमती दिली. या दरम्यान मनपा सहाय्यक आयुक्त शिरीष पवार बैठकीत सामील झाले. हद्दवाढ भागातील विकासकामांबाबत मनपा प्रशासनाने लेखी आश्वासन दिल्याशिवाय आपण येथून हलणार नाही व अधिकाऱ्यांना कोंडून ठेवू, अशी भूमिका भुसे यांनी जाहीर केल्यानंतर अधिकाऱ्यांनी विचारविनिमय करून एक लेखी पत्र तयार केले. ते बघितल्यावर आमदार भुसे अधिक संतप्त झाले. आम्हाला काय मूर्ख समजतात काय, असे म्हणत त्यांनी ते हवेत भिरकावले. आचारसंहिता लागू होण्याअगोदर म्हणजे येत्या १५ आॅगस्टपासून कामे सुरू करण्याचे आश्वासन द्या, अशी आग्रही मागणी भुसे यांनी केली. मात्र मनपा अधिकाऱ्यांनी एकमेकांकडे बघत त्यावर सोयीस्कर मौन बाळगले. त्यामुळे संतप्त झालेल्या भुसे यांनी टेबलावर जोरदार प्रहार केला. त्यानंतर उपस्थित नगरसेवक, सेना पदाधिकारी व नागरिकांनी सभागृहाच्या तोडफोडीस सुरुवात केली. शिष्टमंडळात समाविष्ट महिला तातडीने सभागृहाच्या बाहेर पडल्या. सदर तोडफोडीत सभागृहातील खुर्च्या, खिडक्या, लाइट, कॅल्क्युलेटर, पंखे, झुंबर, एसी, फलक आदि वस्तूंचे नुकसान झाले. काही नागरिक व कार्यकर्ते यांनी आयुक्त जाधव यांच्या कार्यालयाकडे धाव घेतली; मात्र त्यांना आमदार भुसे व पदाधिकाऱ्यांनी रोखले. त्यानंतर मनपाच्या निषेधार्थ घोषणा देत शिष्टमंडळातील नागरिक सभागृहाबाहेर पडले. यावेळी आमदार भुसे यांच्यासह मनपातील विरोधी पक्षनेते दिलीप पवार, शिवसेना गटनेते मनोहर बच्छाव, नगरसेवक तानाजी देशमुख, विठ्ठल बर्वे, नगरसेविका विजया काळे, ज्योती सुराणा, संगीता चव्हाण, भारत म्हसदे, इब्राहिम शेख, प्रमोद शुक्ला, रामा मिस्तरी, कैलास तिसगे आदिंसह हद्दवाढ भागातील नागरिक उपस्थित होते.यावेळी बैठकीस उपस्थित उपायुक्त राजेंद्र फातले, सहाय्यक आयुक्त शिरीष पवार, बांधकाम अभियंता कैलास बच्छाव व अभियंता संजय जाधव यांनी काढता पाय घेतल्याने संतप्त नागरिकांच्या रोषापासून त्यांचा बचाव झाला.