आदिवासी भागात साथीचे आजार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:15 IST2021-07-28T04:15:53+5:302021-07-28T04:15:53+5:30
ग्रामीण भागातही आता परिचारिका भरती नाशिक: वनबंधू कल्याण योजनेंतर्गत जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात कंत्राटी पद्धतीने भरती प्रक्रिया राबविली जाणार ...

आदिवासी भागात साथीचे आजार
ग्रामीण भागातही आता परिचारिका भरती
नाशिक: वनबंधू कल्याण योजनेंतर्गत जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात कंत्राटी पद्धतीने भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे. पुढील महिन्यात २ तारखेला या पदासाठी मुलाखती होणार आहेत. याबाबतचे नियोजन जिल्हा परिषदेकडून करण्यात आले आहे. अनुसूचित जमातीच्या १२ जागांसाठी मुलाखती होणार आहे.
शासकीय कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाला प्राधान्य
नाशिक : शासकीय कार्यालयांमध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्यावर कार्यालयांकडून विशेष दक्षता घेतली जात आहे. पहिला आणि दुसरा डोस घेणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी काही कार्यालयांकडून स्वतंत्र शिबिर देखील घेण्यात आले. जवळपास ७० ते ८० टक्के लसीकरण कार्यालयांनी केल्याचा अंदाज आहे.
पोषण आहार वाटपाची पडताळणी
नाशिक: पोषण आहारात कडधान्य, बटाटे, अंडी, गूळ, शेंगदाणे, फुटाणे असा सकस पोषण आहार बालकांना पुरविण्यात येणार आहे. या अभियानाची सुरुवात करण्यात आली असून, या आहाराचा बालकांसाठीच वापर होतो काय, हे पाहण्याची जबाबदारी अंगणवाडी सेविका, मदतनीस यांच्यावर सोपविण्यात आली आहे.
त्रैमासिक विवरण पत्रासाठी ३० पर्यंत मुदत
नाशिक : सार्वजनिक क्षेत्रातील आस्थापनांनी आपल्याकडील मनुष्यबळाचे त्रैमासिक विवरणपत्र सादर करण्याचे आवाहन कौशल्यविकास, रोजगार व उद्योजकता विभागाचे सहायक आयुक्त अ. ला. तडवी यांनी केले आहे. खासगी क्षेत्रातील २५ किंवा त्यापेक्षा अधिक लोक काम करीत असलेल्या सर्व आस्थापना, उद्योग, व्यापार, व्यावसायिकांना ३० जुलैपर्यंत विवरणपत्र सादर करण्याचे सांगण्यात आले आहे.
नाशिकमधील वाड्यांचा प्रश्नही गंभीर
नाशिक: जुने नाशिक परिसरात मातीचे वाडे धोकादायक असतानाही अशा वाड्यांमध्ये अनेकांचे वास्तव्य आहे. महापालिकेने नेहमीप्रमाणे पावसाळ्यापूर्वी त्यांना नोटीस बजावली आहे. सध्या शहरात मुसळधार पाऊस नसल्याने या बाबतचे गांभीर्य दिसत नसले तरी जोरदार पावसामुळे वाड्यांना धोका निर्माण होऊ शकतो. मागील महिन्यात वाडा पडण्याची घटना शहरात घडून गेली आहे.