भात पिकावर मावा , करपाचा प्रादुर्भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2020 10:23 PM2020-10-14T22:23:15+5:302020-10-15T01:37:34+5:30

वेळुंजे(त्र्यंबकेश्वर): त्र्यंबकेश्वर तालुक्यातील भात, नागली, वरई, उडीद, यासारख्या मुख्य पिकावर करपा तसेच मावा रोगाचा घातक असा परिणाम केल्याने शेतक?्यांच्या हात तोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे.

Outbreaks appear to be exacerbated during rice cultivation | भात पिकावर मावा , करपाचा प्रादुर्भाव

भात पिकावर मावा , करपाचा प्रादुर्भाव

googlenewsNext
ठळक मुद्देत्र्यंबकेश्वर परिसर : शेतकऱ्यांचे कृषिमंत्र्यांना साकडे, पिकांच्या पंचनाम्याची मागणी

वेळुंजे(त्र्यंबकेश्वर): त्र्यंबकेश्वर तालुक्यातील भात, नागली, वरई, उडीद, यासारख्या मुख्य पिकावर करपा तसेच मावा रोगाचा घातक असा परिणाम केल्याने शेतक?्यांच्या हात तोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे. उभे पीक जळाल्याने शेतकरी हैराण झाले आहेत. याच पाश्वर्भूमीवर त्र्यंबकेश्वर तालुक्यातील शिवसेनेचे समाधान बोडके पाटील यांच्या समवेत तालुक्यातील शेतक?्यांनी नाशिक येथे कृषि मंत्री दादा भूसे यांची भेट घेऊन कैफियत मांडली. पीकाची झालेल्या नूकसानीचे भयाण असे वास्तव दाखवून पिकांचे त्वरित कृषि विभागामर्फत पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाईसाठी मागणी केली. यानंतर भुसे यांनी तत्काळ जिल्हा कृषि अधीक्षक यांना सूचना देण्यात आल्या असुन या नुकसान झालेल्या क्षेत्रांची पहाणि करून तत्काळ योग्य त्या उपाय योजना करण्यात याव्या,अश्या कडक सूचना देण्यात आल्या आहेत. त्र्यंबकेश्वर तालुका हा अती दुर्गम आदिवासी बहुल तालुका म्हणुन ओळखला जात असुन येथील शेतकरी वर्गाला नेहमीच कसल्याना कसल्या संकटाना सामोरे जावे लागते. कृषी मंत्र्यांनी आदेश दिल्या नंतर तरी पंचनामे व्हावे अशी अपेक्षा येथील शेतक?्यांनी केली आहे.

कृषि मंत्री दादा भाऊ भूसे यांची भेट घेऊन येथील शेतकरी वर्गाची भात शेतीचे झालेले नुकसान अतिशय भयावह आहे. या शेतकऱ्यांना या भात पीकाची नुकसान भरपाई मिळण्यासाठि त्वरित पंचनामे करावे.
- समाधान बोडके पाटील, शेतकरी

 

Web Title: Outbreaks appear to be exacerbated during rice cultivation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.