लासलगावी कांदा आंदोलकांचा उद्रेक

By Admin | Updated: August 4, 2016 02:09 IST2016-08-04T02:01:55+5:302016-08-04T02:09:48+5:30

लासलगावी कांदा आंदोलकांचा उद्रेक

Outbreak of Lashagavi Onion Activists | लासलगावी कांदा आंदोलकांचा उद्रेक

लासलगावी कांदा आंदोलकांचा उद्रेक


लासलगाव : गोणी पद्धतीने कांदा लिलावाविरुद्धच्या आंदोलनाने बुधवारी लासलगावी वेगळे वळण घेतले. लासलगाव बाजार समितीचे सभापती जयदत्त होळकर आणि काही व्यापाऱ्यांना आंदोलकांनी मारहाण केल्याने बाजार समितीत तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. यामुळे काहीकाळ लिलाव बंद झाले होते. निफाडचे पोलीस उपअधीक्षक दीपक गिऱ्हे व लासलगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जनार्दन सोनवणे यांनी केलेल्या मध्यस्थीनंतर सायंकाळी लिलाव सुरू करण्यात आले. दरम्यान, मारहाणीच्या घटनेच्या निषेधार्थ गुरुवारी (दि. ४) लासलगाव बंदचे आवाहन करण्यात आले आहे.

Web Title: Outbreak of Lashagavi Onion Activists