ढगाळ हवामानामुळे कांद्यावर रोगांचा प्रादुर्भाव रब्बी हंगाम संकटात : बळीराजाचे आर्थिक नियोजन कोलमडनार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2021 05:34 PM2021-01-02T17:34:49+5:302021-01-02T17:35:06+5:30

सटाणा : बागलाणच्या पश्चिम पट्यात ढगाळ हवामानमुळे व मर रोगाने कांदा खराब होत असून, महागडी औषधांची फवारणी करून कांदा वाचविन्याचा प्रयत्न बळीराजा करत आहे. यामुळे रब्बी हंगाम संकटात असून, शेतकऱ्यांचे आर्थिक नियोजन कोलमडणार आहे.

Outbreak of diseases on onion due to cloudy weather in crisis of Rabi season: Baliraja's financial planning Kolmadnar | ढगाळ हवामानामुळे कांद्यावर रोगांचा प्रादुर्भाव रब्बी हंगाम संकटात : बळीराजाचे आर्थिक नियोजन कोलमडनार

ढगाळ हवामानामुळे कांद्यावर रोगांचा प्रादुर्भाव रब्बी हंगाम संकटात : बळीराजाचे आर्थिक नियोजन कोलमडनार

Next

सटाणा : बागलाणच्या पश्चिम पट्यात ढगाळ हवामानमुळे व मर रोगाने कांदा खराब होत असून, महागडी औषधांची फवारणी करून कांदा वाचविन्याचा प्रयत्न बळीराजा करत आहे. यामुळे रब्बी हंगाम संकटात असून, शेतकऱ्यांचे आर्थिक नियोजन कोलमडणार आहे.
कसमादे पट्ट्यात मोठ्या प्रमाणात कांद्याची लागवड केली जाते. कांदा पिकाकडे शेतकरी आकर्षित झाले आहेत. कांदा हे तीन ते चार महिन्यांत येत आहे. नगदी पीक म्हणून या पिकाकडे शेतकरी मोठ्या प्रमाणात वळले आहेत. कांद्याला चालू वर्षी सुरुवातीपासून बाजारभाव चांगला असल्यामुळे गेल्या वर्षाच्या तुलनेत या वर्षी समसमान क्षेत्र लागवड होणार आहे, पण निसर्गाच्या लहरीपणा आणि हवामानाचा हट्टीपणा बळीराजाचा पिच्छा सोडण्यास तयार होत नाही. परिणामी, महागडी औषधांची फवारणी करून कांदा पीक वाचविण्याच्या प्रयत्नात बळीराजा दिसत आहे.
कमी खर्चात चांगले उत्पन्न देणारे भाजीपाला पिकेही या वर्षी कवडीमोल भावात विकले जात असल्याने, परिसरातील बळीराजा दुहेरी संकटात सापडला आहे. सुरुवातीला चांगले वातावरण असल्यामुळे पिके जोमात होती, पण गेल्या दोन ते तीन दिवसांपासून अचानक वातावरणामध्ये बदल झाल्यामुळे, ऐन जोमात असलेल्या कांदा पिकांवर्ती मावा, तुडतुडे, पिवळेपणा, गेड्या वाळणे असे अनेक रोग अट्याक करत आहे.
पिके वाचविण्याचे आव्हान
रोप वाचण्यापासून शेतकऱ्यांचा संघर्ष सुरू आहे. कांदा लागवड करून लगेच दुसरे संकट मर रोगाचा प्रादुर्भाव. गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे परिसरातील शेतकरी हतबल झाला आहे. रबी हंगामातील पिकांची लागवड केली खरी, पण बदलत्या हमानामुळे शेतकऱ्याच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत चालल्याने पिके वाचविण्याचे बळीराजापुढे मोठे आव्हान उभे राहिले आहे.
माझा दोन एकर कांदा लागवड करून एक महिने झाले आहेत. सुरुवातीपासून कांद्याला मर रोगाने ग्रासले आहे. बदलत्या हवामानामुळे कांद्यावर अनेक रोग चाल करत आहेत. महागडी फवारणी करूनही हवामान साथ देत नाही.
- संतोष बागुल, कांदा उत्पादक, वटार
 

Web Title: Outbreak of diseases on onion due to cloudy weather in crisis of Rabi season: Baliraja's financial planning Kolmadnar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :onionकांदा