मालेगावी लोकअदालतीत ८६ प्रकरणे निकाली
By Admin | Updated: July 2, 2014 00:31 IST2014-07-01T22:01:58+5:302014-07-02T00:31:18+5:30
मालेगावी लोकअदालतीत ८६ प्रकरणे निकाली

मालेगावी लोकअदालतीत ८६ प्रकरणे निकाली
मालेगाव : येथील तालुका विधी सेवा समिती व वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने प्रलंबित दिवाणी फौजदारी व मोटार अपघात नुकसानभरपाई या प्रकरणांसाठी लोकअदालत घेण्यात आले. त्यात ८६ प्रकरणे निकाली काढण्यात आली.
लोकअदालतींचे उद्घाटन तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष जिल्हा न्यायाधीश १ सी. डब्ल्यू. सैंदाणी यांच्या हस्ते झाले. प्रास्ताविक मालेगाव वकील संघाचे अध्यक्ष अॅड. सुधाकर निकम यांनी केले. डॉ. एस. आर. जैयस्वाल यांनी दोन्ही पक्षांनी दोन पाऊल पुढे येऊन आपसातील कटुता संपवून लोकअदालत यशस्वी करण्याचे आवाहन केले. सी. डब्ल्यू. सैंदाणी म्हणाले की, प्रत्येकाने आपल्या मनातील अधिकचे मिळविण्याची लालसा शांत केली पाहिजे. स्वत:च्या अहंकारावर नियंत्रण मिळवून आपण सामंजस्याने लोकअदालतीसारख्या उपक्रमांना चांगला प्रतिसाद दिला पाहिजे. जेणे करून समाजात शांतता व सुव्यवस्था नांदेल.
यावेळी व्ही. व्ही. ठाकरे, सहदिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर, एम. पी. भावसार, सहदिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर, सी. पी. रघुवंशी, सहदिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर, ए. आर. कल्हापुरे, सहदिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर, अॅड. जलील अन्सारी, अॅड. हर्षद जाधव, अॅड. रत्नाकर खरे, अॅड. किशोर त्रिभुवन, अॅड. योगीता परदेशी, गटविकास अधिकारी सिद्धार्थ अजवेलकर उपस्थित होते.
लोकअदालतीत प्रलंबित दिवाणी, फौजदारी, वीजचोरीची प्रकरणे, धनादेश न वटल्याची प्रकरणे, मोटार अपघात नुकसानभरपाई प्रकरणांच्या निपटाऱ्यासाठी एकूण चार पॅनल करण्यात आले होते. न्यायाधीश सर्वश्री सैंदाणी, डॉ. जयस्वाल, पी. पी. अभंग, पी. सी. काळे यांनी कामकाज पाहिले.
त्यांना पॅनल मेंबर म्हणून अॅड. योगीता परदेशी, सिद्धार्थ देवरे, सुफियान अन्सारी, इम्तियाज हाफीज, यू. डी. पठाडे, किशोर व्ही. त्रिभुवन, संदीप हिरे, ए. ए. रहेमान यांनी सहकार्य केले. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन अॅड. चंद्रशेखर शेवाळे यांनी केले. (वार्ताहर)