निफाडमधील ६५ ग्रामपंचायतसाठी२४४७ उमेदवारांपैकी ४२ अर्ज अर्वैध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2021 00:10 IST2020-12-31T21:53:02+5:302021-01-01T00:10:56+5:30
निफाड : तालुक्यातील ६५ ग्रामपंचायतीसाठी एकूण दाखल झालेल्या २४४७ उमेदवारी अर्जापैकी ४२ अर्ज गुरुवारी (दि.३१) झालेल्या छाननीमध्ये बाद झाले असून २४०५ अर्ज वैध झाल्याची माहिती तहसीलदार शरद घोरपडे यांनी दिली.

निफाडमधील ६५ ग्रामपंचायतसाठी२४४७ उमेदवारांपैकी ४२ अर्ज अर्वैध
निफाड : तालुक्यातील ६५ ग्रामपंचायतीसाठी एकूण दाखल झालेल्या २४४७ उमेदवारी अर्जापैकी ४२ अर्ज गुरुवारी (दि.३१) झालेल्या छाननीमध्ये बाद झाले असून २४०५ अर्ज वैध झाल्याची माहिती तहसीलदार शरद घोरपडे यांनी दिली.
गुरुवारी मार्केट कमिटी हॉल व ग्रामसंस्कार केंद्र येथे छाननी प्रक्रिया पार पडली. ६५ ग्रामपंचायतीच्या २४२ प्रभागातील ६७५ जागांसाठी ही निवडणूक होत आहे.
ओझर ग्रामपंचायतीच्या १७ जागांसाठी १३५, लासलगाव ग्रामपंचायतीच्या १७ जागांसाठी ८२ अर्ज वैध ठरले आहेत. तर सायखेडा ग्रामपंचायतीच्या १७ जागांसाठी ९० अर्ज वैध ठरले आहेत. यानंतर प्रत्यक्ष माघारीच्या दिवसानंतर किती उमेदवार रिंगणात असतील ते चित्र सोमवारी स्पष्ट होईल.