विंचूर येथे ‘आमचं गाव, आमचा विकास’ उपक्रम
By Admin | Updated: July 26, 2016 22:12 IST2016-07-26T22:12:47+5:302016-07-26T22:12:47+5:30
विंचूर येथे ‘आमचं गाव, आमचा विकास’ उपक्रम

विंचूर येथे ‘आमचं गाव, आमचा विकास’ उपक्रम
लासलगाव : टाकळी (विंचूर) येथे गावाच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्र सरकारने सुरू केलेल्या ‘आमचं गाव, आमचा विकास’ कार्यक्रम घेण्यात आला. शून्य दिवसाला सायंकाळी चार वाजता सरपंच ललिता गांगुर्डे यांच्या हस्ते मशाल प्रज्वलित करून ग्रामपंचायत कार्यालयापासून फेरी काढण्यात आली. त्यानंतर गावातील विविध समस्यंसंबंधात ग्रामसभेचे आयोजन करून ग्रामविकास अधिकारी गवई यांनी शासनाच्या पुस्तिकेसह विकास आराखडा व तीन दिवसाचे अभिनव उपक्र म समजून सांगितले.
या कार्यक्रमास उपसरपंच शिवाजी सुराशे, ग्रामपंचायत सदस्य नवनाथ पवार, राजू आहिरे, सोमनाथ गांगुर्डे यांच्या प्रमुख उपस्थितीत ग्रामपंचायत कर्मचारी प्रकाश संसारे, सतीश वाळके, रयत शिक्षण संस्थेचे न्यू इंग्लिश स्कूल, जि. प. शाळा या तीनही शाळांचे मुख्याध्यापक चौरे, चव्हाण, देवरे, जितेंद्र आहिरे तसेच शिक्षक, विद्यार्थी, सर्व अंगणवाडी सेविका व मदतनीस, आरोग्यसेवक आशा स्वयंसेविका, महिला बचतगटाच्या प्रतिनिधी सिंधूबाई पल्हाळ आदि उपस्थित होते.