आम्हा ब्रह्मांड पंढरी।
By Admin | Updated: July 15, 2016 23:48 IST2016-07-15T23:45:00+5:302016-07-15T23:48:24+5:30
आम्हा ब्रह्मांड पंढरी।

आम्हा ब्रह्मांड पंढरी।
नाशिक : आषाढी एकादशीनिमित्त जिल्ह्यात ठिकठिकाणी दिंडी काढून वारकऱ्यांसमवेत विविध
शाळांमधील विद्यार्थ्यांनी भागवत संप्रदायाची पताका फडकविली. संत परंपरा, पंढरपूर व आषाढी एकादशीचे
महत्त्व याच सोबत वृक्षारोपणाचा संदेश यानिमित्त देण्यात आला. विठ्ठल मंदिरांमध्ये विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी विधिवत पूजा करून आरती केली व प्रसादाचे वाटपही केले.
विठुनामाचा गजर
येवला : आषाढी एकादशीनिमित्त शहर व तालुक्यातून सुमारे १२५ दिंड्यांनी टाळ-मृदंगाच्या साथीने विठूचा नामगजर करत कोटमगाव बुद्रूक येथील विठ्ठल मंदिरात हजेरी लावली.
यंदा शहरातील स्वामी मुक्तानंद प्राथमिक विद्यामंदिर, जनता प्राथमिक विद्यालय, ओम गुरु देव इंग्रजी माध्यम या शाळांनी विठूरायाचा गजर शहरात केला. विठ्ठल-रु खमाईची पालखी काढली. पंढरीचे बालवारकरी, कलशधारी मुली, डोक्यावर तुळस घेतलेल्या मुली विविध पारंपरिक वेशभूषेत दिंडी काढली. येवला शहर या निमित्ताने पंढरपूरची मिनी आवृत्तीच झाले.
येवले शहरातील मध्यवस्तीतील विठ्ठल मंदिरातून विठुनामाचा गजर करत भव्य मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत अग्रभागी बँँडपथक आणि भगवे झेंडे होते. ग्यानबा-तुकाराम म्हणत टाळकरी मिरवणुकीत सहभागी झाले होते. पारंपरिक लाकडी रथातून विठोबा-रखूमाईची प्रतिमा ठेवली होती. विठ्ठल मंदिराचे पुजारी दिलीप पाटील, ह.भ.प. ज्ञानेश्वर माउली, नारायण मामा शिंदे, सतीश संत, प्रभाकर झळके, अविनाश पाटील यांच्यासह भाविक भक्त मोठ्या संख्येने मिरवणुकीत सहभागी झाले होते.