...अन्यथा स्वेच्छामरणाची परवानगी द्या!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:47 IST2021-02-05T05:47:05+5:302021-02-05T05:47:05+5:30
बीएचआर पतसंस्थेत येथील अनेक ठेवीदारांच्या ठेवी आहेत. गेल्या सात वर्षांपासून ठेवींच्या मुदती संपल्या असून अद्यापही रक्कम परत मिळालेली नसल्याने ...

...अन्यथा स्वेच्छामरणाची परवानगी द्या!
बीएचआर पतसंस्थेत येथील अनेक ठेवीदारांच्या ठेवी आहेत. गेल्या सात वर्षांपासून ठेवींच्या मुदती संपल्या असून अद्यापही रक्कम परत मिळालेली नसल्याने ठेवीदार आर्थिक अडचणीत सापडले आहेत. येवल्यातील अनेकांनी निवृत्तीनंतर मिळालेली रक्कम या पतसंस्थेत ठेवरूपात ठेवली आहे. ज्येष्ठ ठेवीदारांच्या ठेवी अडकल्यामुळे अनेकांचे हाल होत आहेत. घरात असलेली जमापुंजी औषधोपचारासाठी खर्च झाली आहे. आता उत्पन्नाचे काहीही साधन नसल्याने व या वयात कामधंदा करणे शक्य नसल्याने पैशाअभावी उपचार बंद करण्याची वेळ आली आहे. आम्हाला स्वेच्छा मरणाची कायदेशीर परवानगी देण्यात यावी यासाठी न्यायालयात जाण्याची मानसिकता झाल्याची भावना काही ठेवीदारांनी बैठकीत व्यक्त केली. न्याय मिळण्यासाठी महाराष्ट्र राज्य ठेवीदार संघर्ष समिती या एका छताखाली येऊन लढा द्यावा, असे आवाहन येवला ज्येष्ठ नागरिक संघटनेचे गुमानसिंग परदेशी, उपाध्यक्ष सुधाकर पाटील, दिलीप नागरे, सुभाष विसपुते, कृष्णा शिंदे, नामदेव कोल्हे, सोपान सानप, प्रभाकर मढे, सुनील कायस्थ, सचिन पवार, प्रल्हाद कोतवाल, वसंत गोसावी यांनी बैठकीत केले.