कळवण : खरीप २०२० या वर्षात कळवण तालुक्यातील प्रत्येक गावात कृषी संजीवनी सप्ताह साजरा करण्याचा तालुका कृषी कार्यालयामार्फत गाव निहाय आराखडा तयार करण्यात आला आहे. कृषी संजीवनी सप्ताहात कृषी विभाग-जिल्हा परिषद, कृषी विद्यापीठे, कृषि विज्ञान केंद्र यांचे शास्त्रज्ञ,आत्मा,कृषि मित्र मार्गदर्शनाखाली गावनिहाय बैठका घेऊन तसेच शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन मार्गदर्शन करण्यात येणार आहे.पीक उत्पादनावर परिणाम न करता उत्पादन खर्च कमी करणे, प्रधानमंत्री पिक विमा योजना, हवामान आधारित फळपिक विमा योजना, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना बाबत जनजागृती करणे व प्रसिध्दी देणे,प्रधानमंत्री कृषि सिंचन योजना,जमीन आरोग्य पत्रिका वितरण व वाचन,परंपरागत कृषि विकास योजना,केंद्ग व राज्य शासनाच्या कृषि व कृषि संलग्न विभागाच्या शेतकर्यांसाठी असलेल्या योजनांबाबत मार्गदर्शन, मका पिकावरील लष्करी अळी व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन, रु ंद सरी कडधान्य आंतरपिकाबाबत मार्गदर्शन, बहूपीक पध्दतीची प्रसार, एकात्मीक शेती पध्दती संकल्पनेबाबत, हायड्रोफोनिक्स -हिरवा चारा निर्मीती, भात लागवड, बी-बियाणे, खते,औषधे खरेदी व वापर करताना घ्यावयाची काळजी, मुलस्थानी जलसंधारण जनजागृती ,आपत्कालीन पीक नियोजन आदींविषयी मार्गदर्शन करण्यात येणार आहे.तालुका कृषी कार्यालयातील कृषि सहाय्यक, कृषि पर्यवेक्षक व मंडळ कृषि अधिकारी हे गावनिहाय बैठकींना उपस्थित राहणार असून सर्व शेतकरी बांधवांनी उपस्थित राहून या सप्ताहाचा लाभ घेण्याचे आवाहन तालुका कृषि अधिकारी विजय पाटील यांनी केले आहे.
कृषि संजीवनी सप्ताह अंतर्गत गावनिहाय बैठकांचे आयोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2020 17:47 IST
कळवण : खरीप २०२० या वर्षात कळवण तालुक्यातील प्रत्येक गावात कृषी संजीवनी सप्ताह साजरा करण्याचा तालुका कृषी कार्यालयामार्फत गाव निहाय आराखडा तयार करण्यात आला आहे. कृषी संजीवनी सप्ताहात कृषी विभाग-जिल्हा परिषद, कृषी विद्यापीठे, कृषि विज्ञान केंद्र यांचे शास्त्रज्ञ,आत्मा,कृषि मित्र मार्गदर्शनाखाली गावनिहाय बैठका घेऊन तसेच शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
कृषि संजीवनी सप्ताह अंतर्गत गावनिहाय बैठकांचे आयोजन
ठळक मुद्देकळवण : कृषि विभागामार्फत तयार केला आराखडा