बळीराजा अभिवादन रॅलीचे आज आयोजन

By Admin | Updated: October 24, 2014 01:03 IST2014-10-24T00:54:50+5:302014-10-24T01:03:00+5:30

बळीराजा अभिवादन रॅलीचे आज आयोजन

Organizing the rally today | बळीराजा अभिवादन रॅलीचे आज आयोजन

बळीराजा अभिवादन रॅलीचे आज आयोजन

 

नाशिक : अत्याचारविरोधी कृती समितीच्या वतीने शहरातील पुरोगामी संघटनांची बळीराजा अभिवादन रॅली उद्या (दि. २४) सकाळी ११ वाजता काढण्यात येणार आहे.
शिवाजीरोड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून रॅलीला सुरुवात होईल. तेथून संत गाडगेबाबा पुतळा, मेनरोड, रेडक्रॉस सिग्नलमार्गे हुतात्मा स्मारक येथे रॅलीचा समारोप होईल.
तेथे दुपारी १ वाजता स्थानिक शाहीर कलावंत परिवर्तनवादी गीते सादर करतील. तसेच विद्रोहीरत्न पुरस्काराचे वितरण केले जाईल, असे राहुल तुपलोंढे, नितीन रोटे (पाटील), हंसराज वडघुले, अ‍ॅड. शरद जाधव, संतोष गायधनी, अविनाश अहेर यांनी कळवले असून, सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Organizing the rally today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.