सिन्नरला रविवारी ‘गोंदेश्वर श्री’ स्पर्धेचे आयोजन
By Admin | Updated: February 14, 2015 00:02 IST2015-02-14T00:02:08+5:302015-02-14T00:02:08+5:30
सिन्नरला रविवारी ‘गोंदेश्वर श्री’ स्पर्धेचे आयोजन

सिन्नरला रविवारी ‘गोंदेश्वर श्री’ स्पर्धेचे आयोजन
सिन्नर : येथील वाजे विद्यालयात रविवारी (दि. १५) सायंकाळी सहा वाजता ‘गोंदेश्वर श्री’ या जिल्हास्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
तरुण व्यसनांपासून दूर रहावे व त्यांच्या व्यायामाची आवड निर्माण व्हावी, यासाठी नाशिक जिल्हा हौशी शरीरसौष्ठव संघटनेच्या मान्यतेने सिन्नर येथे दरवर्षी जिल्हास्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेचे आयोजन केले आहे. सिन्नरच्या नावलौकिकात भर घालणाऱ्या गोंदेश्वर मंदिराच्या नावावरून यंदापासून या स्पर्धेचे ‘गोंदेश्वर श्री’ असे नामकरण करण्यात आले आहे. जिल्ह्यातील व्यायामशाळा, हेल्थ क्लब व इतर क्रीडा संस्थांनी आपले उत्कृष्ट शरीरसौष्ठवपटू या स्पर्धेसाठी पाठविण्याचे आवाहन नाशिक जिल्हा हौशी शरीरसौष्ठव संघटना, उत्तर महाराष्ट्र श्री विजेते रवींद्र वर्पे, विकी वरंदळ, सूरज गोसावी, निरज लचके आदिंनी केले आहे. (वार्ताहर)