दसऱ्याच्या दिवशी धम्म सोहळ्याचे आयोजन
By Admin | Updated: October 17, 2015 23:22 IST2015-10-17T23:09:27+5:302015-10-17T23:22:23+5:30
दसऱ्याच्या दिवशी धम्म सोहळ्याचे आयोजन

दसऱ्याच्या दिवशी धम्म सोहळ्याचे आयोजन
पाथर्डी फाटा : येथील नालंदा एज्युकेशनल अॅण्ड सोशल ट्रस्ट व महापालिकेच्या वतीने दसऱ्याच्या दिवशी धम्मसोहळा येथील त्रिरश्मी लेणे येथे आयोजित करण्यात आला आहे. विजयादशमी आणि धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त आयोजित या कार्यक्रमात धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
या धम्म सोहळ्यात मोफत सर्वरोगनिदान शिबिर, रक्तदान शिबिर असे विविध कार्यक्रम होणार असून, त्यानिमित्ताने बुद्धगीतांचा कार्यक्रम, सामुदायिक बुद्धवंदना व धम्मसभेचे आयोजन करण्यात आले आहे. धम्मसभेचे उद्घाटन पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते होणार असून, प्रमुख अतिथी म्हणून महापौर अशोक मुर्तडक, उपमहापौर गुरुमितसिंग बग्गा, स्थायी समिती सभापती शिवाजी चुंभळे तसेच पालिकेचे अन्य पदाधिकारी आणि खासदार, आमदार उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती भदन्त धम्मदीप व भदन्त आर्यनाग यांनी दिली. दरवर्षी दसऱ्याच्या दिवशी अशा प्रकारे कार्यक्रम होत असतो. या कार्यक्रमासाठी नागरिक उपस्थित राहतात.