धोंडमाळमध्ये बालसभेचे आयोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:47 IST2021-02-05T05:47:00+5:302021-02-05T05:47:00+5:30
------------------------------------------ गडगेश्वर क्रिकेट स्पर्धा उत्साहात पेठ - तालुक्यातील शेवखंडी येथे चंद्रकांत गायकवाड (ठाणे पोलीस) व गडगेश्वर क्रिकेट ...

धोंडमाळमध्ये बालसभेचे आयोजन
------------------------------------------
गडगेश्वर क्रिकेट स्पर्धा उत्साहात
पेठ - तालुक्यातील शेवखंडी येथे चंद्रकांत गायकवाड (ठाणे पोलीस) व गडगेश्वर क्रिकेट क्लब शेवखंडी यांच्या संयुक्त विद्यमाने शेवखंडी प्रीमियर लीग स्पर्धा उत्साहात संपन्न झाल्या.
यामध्ये हरसूलच्या न्यू स्टार संघाने प्रथम, गणेशगाव संघाने दुसरे, शिंदे संघाने तृतीय तर शेरखंडी व चोळमुख संघाने उत्तेजनार्थ पारितोषिक पटकावले. मॅन ऑफ दि सिरीज - हेमंत लहारे (हरसूल टीम)
उत्कृष्ट गोलंदाज - जनार्धन (शिंदे संघ)
उत्कृष्ट फलंदाज - आनंदा (चोळमुख संघ) यावेळी खेळाडू व क्रिकेटप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
---------------------------------------------------------------
शैक्षणिक साहित्य वाटप
पेठ - महाराष्ट्र राज्य धनगर समाज युवा संघटनेच्या सामाजिक दायित्वातून हट्टीपाडा येथील विद्यार्थ्यांना पेठ तालुकाप्रमुख प्रवीण बिडगर यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य मीना बिडगर, उपाध्यक्ष मोहन बिडगर, नामदेव दिवटे, सुनील भडांगे, दीपक भडांगे, प्रकाश हाराळ, कृष्णा भडांगे, गिरीधर दिघे, गोरख धारणे, मनोहर हुलगुंडे, मनु धारणे, उत्तम दिघे, मुख्याध्यापक धनराज सगणे, सुभाष भुसारे आदी उपस्थित होते.
--------------------------------------------------------
सावळे यांचा निवृत्तीनिमित्त सत्कार
पेठ - जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पेठ नंबर २ येथील शाळेच्या पदवीधर शिक्षिका प्रमिला वाल्मीक सावळे या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त झाल्या. पंचायत समिती शिक्षण विभागाच्या वतीने सभापती विलास अलबाड यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी माजी उपसभापती तुळशीराम वाघमारे, सुरेश पवार, मोहन कामडी, गट शिक्षणाधिकारी सरोज जगताप, केंद्र प्रमुख मोतीराम सहारे, पुष्पा गीत, मनोहर टोपले, मोतीराम नाठे, वाल्मीक सावळे यांच्यासह सर्व शिक्षक संघटना समन्वय समिती सदस्य उपस्थित होते.
----------------------------------------------------------
शिक्षक समन्वय समितीची चर्चा
पेठ - तालुका सर्व प्राथमिक शिक्षक संघटना समन्वय समितीने गटशिक्षणाधिकारी सरोज जगताप यांची भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली. एमएससीआयटी वसुली थांबवावी, कोरोना चेकपोस्ट ड्युटी रद्द करावी, निवडश्रेणी प्रस्ताव सादर करावेत, नियमित वेतन यासह शिक्षकांचे सेवा पुस्तक अद्ययावत करणेबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी कार्यालयीन अधीक्षक विशाल सूर्यवंशी यांच्यासह पेठ तालुका सर्व शिक्षक संघटना समन्वय समिती सदस्य उपस्थित होते.