विद्यार्थ्यांसाठी व्यवसाय प्रशिक्षण शिबिराचे आयोजन
By Admin | Updated: May 31, 2014 00:49 IST2014-05-31T00:14:18+5:302014-05-31T00:49:52+5:30
नाशिक : संदीप फाऊंडेशनच्या वतीने विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकरीता संपूर्ण आयुष्यभर चालणार्या व्यवसाय प्रशिक्षण शिबिराचे आयोजन संदीप पॉलिटेक्निकमध्ये करण्यात आले आहे.

विद्यार्थ्यांसाठी व्यवसाय प्रशिक्षण शिबिराचे आयोजन
नाशिक : संदीप फाऊंडेशनच्या वतीने विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकरीता संपूर्ण आयुष्यभर चालणार्या व्यवसाय प्रशिक्षण शिबिराचे आयोजन संदीप पॉलिटेक्निकमध्ये करण्यात आले आहे.
या प्रशिक्षणात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना विविध तज्ञ व नामवंत उद्योजकांचे मार्गदर्शन लाभणार आहे.
या शिबिरात विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकते बाबतचा दृष्टीकोन वृद्धिंगत करणे व उद्योजकतेचा विकास करणे आहे.
विविध व्यवसायाचे प्रकल्प कसे सादर करावे? व्यवसाय कोणता करावा? निवडलेल्या व्यवसायाची जागा, बाजारमूल्य, लागणारी साधनसामुग्री यांचे सखोल प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
या प्रशिक्षणाची संकल्पना संदीप फाऊंडेशनचे चेअरमन डॉ. संदीपकुमार झा यांनी मांडली असून विद्यार्थ्यांना प्रशिक्षणाची सुवर्णसंधी उपलब्ध करून दिली. यात सहभागी होणार्या प्रत्येक विद्यार्थ्यांना संदीप फाऊंडेशन प्रायोजित करेल, तसेच या प्रशिक्षणातून जे विद्यार्थी उद्योजक होतील त्यांना संदीप फाऊंडेशन सर्वतोपरी मदत करील अशी घोषणा डॉ. संदीपकुमार झा यांनी केली.
या प्रशिक्षणासाठी विभागप्रमुख प्रा. एस.ए. शुक्ला व प्रा. के.के. आंबेकर समन्यवक म्हणून काम बघणार आहेत. (प्रतिनिधी)