‘आरोहण’ सप्ताहाचे आयोजन
By Admin | Updated: January 6, 2017 00:04 IST2017-01-06T00:04:37+5:302017-01-06T00:04:51+5:30
मनमाड : शहर पोलीस ठाण्याकडून विद्यार्थ्यांना ज्ञानार्जन

‘आरोहण’ सप्ताहाचे आयोजन
मनमाड : शहर पोलीस ठाण्यात पोलीस प्रशासनाच्या आरोहण सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून, त्याअंतर्गत शालेय विद्यार्थ्यांना पोलिसांच्या कार्याविषयी माहिती मिळावी या हेतूने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
भारताचे माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी २ जानेवारी या दिवशी राज्य पोलीस दलाला ध्वज प्रदान केला म्हणून या दिवसाला आरोहण दिन म्हणून साजरे केले जाते. या दिनानिमित्त विद्यार्थ्यांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
पोलीस निरीक्षक पुंडलिक सपकाळे यांनी वाहतुकीचे नियम व त्याविषयी करावयाची जनजागृती यावर प्रात्यक्षिकांसह माहिती दिली. विद्यार्थ्यांच्या मनात निर्माण झालेल्या अनेक शंकांचे निरसन यावेळी करण्यात आले. विद्यालयाचे प्राचार्य रॉल्फी मसक्रेन्स यांनी प्रास्ताविकातून विविध उपक्रमांबाबत माहिती दिली. गायन स्पर्धेत प्रथम आलेल्या समीक्षा पगारे या विद्यार्थिनीने गीत गाऊन अतिथींचे स्वागत केले. (वार्ताहर)मनमाड : शहर पोलीस ठाण्याकडून विद्यार्थ्यांना ज्ञानार्जन
‘आरोहण’ सप्ताहाचे आयोजनमनमाड : शहर पोलीस ठाण्यात पोलीस प्रशासनाच्या आरोहण सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून, त्याअंतर्गत शालेय विद्यार्थ्यांना पोलिसांच्या कार्याविषयी माहिती मिळावी या हेतूने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
भारताचे माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी २ जानेवारी या दिवशी राज्य पोलीस दलाला ध्वज प्रदान केला म्हणून या दिवसाला आरोहण दिन म्हणून साजरे केले जाते. या दिनानिमित्त विद्यार्थ्यांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
पोलीस निरीक्षक पुंडलिक सपकाळे यांनी वाहतुकीचे नियम व त्याविषयी करावयाची जनजागृती यावर प्रात्यक्षिकांसह माहिती दिली. विद्यार्थ्यांच्या मनात निर्माण झालेल्या अनेक शंकांचे निरसन यावेळी करण्यात आले. विद्यालयाचे प्राचार्य रॉल्फी मसक्रेन्स यांनी प्रास्ताविकातून विविध उपक्रमांबाबत माहिती दिली. गायन स्पर्धेत प्रथम आलेल्या समीक्षा पगारे या विद्यार्थिनीने गीत गाऊन अतिथींचे स्वागत केले. (वार्ताहर)