मानवता महोत्सवाचे उद्या आयोजन

By Admin | Updated: September 27, 2014 00:13 IST2014-09-27T00:13:01+5:302014-09-27T00:13:23+5:30

मानवता महोत्सवाचे उद्या आयोजन

Organized tomorrow for the Humanity Festival | मानवता महोत्सवाचे उद्या आयोजन

मानवता महोत्सवाचे उद्या आयोजन

नाशिक : राष्ट्रसंत गुरुदेव श्री नम्रमुनीजी महाराज यांच्या ४४ व्या जन्मोत्सवानिमित्त रविवारी (दि. २८) सकाळी ९ वाजता ‘मानवता महोत्सव’ साजरा केला जाणार आहे.
देवळाली येथील श्री वर्धमान स्थानकवासी जैन संघाच्या प्रांगणात हा कार्यक्रम होणार आहे. महोत्सवात सहभागी बंधू-भगिनी गुरुदेवांच्या मुखातून भगवान पार्श्वनाथांचे महाप्रभावक श्री उवसग्गहर स्तोत्र ऐकू शकणार आहेत. यावेळी श्रमणसंघीय श्री गौतममुनी, साध्वी रत्ना विरलप्रज्ञा, वीरमतीबाई महासतीजी, नवदीक्षिता महासतीजी यांच्यासह अन्य संतांचे दर्शन घेता येणार आहे. महोत्सवात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या सर्वांनी सफेद वस्त्रे परिधान करून येणे अनिवार्य आहे, असे कळवण्यात आले आहे.

Web Title: Organized tomorrow for the Humanity Festival

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.