गणराज बहुउद्देशीय संस्थेतर्फे उद्या छठपर्वचे आयोजन
By Admin | Updated: November 15, 2015 23:01 IST2015-11-15T23:00:54+5:302015-11-15T23:01:30+5:30
गणराज बहुउद्देशीय संस्थेतर्फे उद्या छठपर्वचे आयोजन

गणराज बहुउद्देशीय संस्थेतर्फे उद्या छठपर्वचे आयोजन
पंचवटी : येथील श्री गणराज बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही छठपर्व २०१५चे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवारी सायंकाळी पाच ते रात्री दहा या वेळेत गंगाघाटावर छठपूजेचा कार्यक्रम होणार असून, या छठपूजेनिमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न होणार आहे.
या कार्यक्रमाचे उद््घाटन गारगोटी संग्रहालयाचे के. सी. पांडे यांच्या हस्ते करण्यात येणार असून, कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघाचे आमदार बाळासाहेब सानप, उपमहापौर गुरुमितसिंह बग्गा आदिंसह मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
या छठपर्व निमित्ताने गंगाघाटावरील श्री चक्रधर स्वामी स्तंभाजवळ हा कार्यक्रम होणार असून, कार्यक्रमाचे आयोजन संस्थापक अध्यक्ष उमापती ओझा यांनी केले आहे. गणराज बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेतर्फे आयोजित कार्यक्रमाचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन ओझा, छठ समिती अध्यक्ष रविप्रकाश सोनार, रवींद्र गुप्ता, सुभाष अग्रहरी, हिरालाल परदेशी, चंद्रकांत पाटील, उमेश सिंग, संतोष कोकाटे आदिंनी केले आहे. दरम्यान, छठ पूजेसाठी पोलीसांनी बंदोबस्ताचे नियोजन केले आहे. (वार्ताहर)