शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्रपती संभाजीराजेंच्या उमेदवारीवर उदय सामंताचा दावा; 'त्या' ड्राफ्टबाबत खळबळजनक खुलासा
2
धुळ्याचा राजकीय धुरळा! ज्यांच्या उमेदवारीविरोधात तिसरी आघाडी स्थापन केली, गोटेंनी त्यांनाच पाठिंबा दिला 
3
भाजपने मुंबईतील तीन उमेदवार का बदलले? फडणवीस म्हणाले, 'ज्यांना बदललं त्यांनी...'
4
Binanceच्या फाऊंडरची तुरुंगात रवानगी, सर्वात श्रीमंत Crypto नं काय केली गडबड? दहशतवादाशी निगडीत प्रकरण
5
नाशिक लोकसभेत तीन शिवसैनिक भिडणार; गोडसे, वाजे अन् करंजकरांमध्ये कोण मारणार बाजी?
6
Sanjay Singh : "कोविशील्डचे गंभीर परिणाम, मृत्यू..."; आप नेते संजय सिंह यांची मोठी मागणी
7
Nashik: अखेर नाशिक शिंदेंच्या शिवसेनेकडेच, हेमंत गोडसे यांची उमेदवारी जाहीर 
8
"किरीट सोमय्यांना यामिनी जाधव, रवींद्र वायकरांसाठी 'स्टार प्रचारक' करा"; अनिल परबांचा टोला
9
ठाण्यात नरेश म्हस्केंचा विजय होईल, राजन विचारे ८ वर्ष गायब होते; मनसेचा टोला
10
परत ईडीची नोटीस येईल, २०२४ मध्ये अजित पवारांनी पुन्हा दैवत बदललेले असेल; राऊतांचे संकेत
11
Godrej Family Split: १२७ वर्षांनंतर होणार 'गोदरेज'च्या साम्राज्याची वाटणी; पाहा कोणाला काय मिळणार?
12
गाझामध्ये दिसला अमेरिकेचे सर्वात धोकादायक बॉम्बर एअरक्राफ्ट! एकाच वेळी 16 अणुबॉम्बसह करू शकते उड्डाण
13
'अनुपमा' फेम अभिनेत्री रुपाली गांगुलीने केला भाजपात प्रवेश, म्हणाली, "विकासाच्या महायज्ञात...'
14
पालघरची जागा भाजपाने घेतली; बावनकुळे-भुजबळांचा शिंदेंना संदेश, नाशिकचे ठरवा...
15
Maruti Suzuki Swift Booking : फक्त 11,000 रुपयांत करू शकता मारुती सुझुकी स्विफ्टचे बुकिंग; 'या' दिवशी येणार बाजारात
16
Bansuri Swaraj : 84 लाखांची कार, 3 फ्लॅट्स अन् बरंच काही...; बांसुरी स्वराज यांची किती आहे संपत्ती?
17
‘मी राजकारणात पॉलिसी मेकिंगसाठी आले आहे’, टीकाकारांना सुप्रिया सुळे यांनी दिलं प्रत्युत्तर
18
दिल्लीतल्या ६० शाळा बॉम्बने उडवून देण्याची धमकी; गृहमंत्रालयाने दिली महत्त्वाची सूचना
19
"राहुल गांधींनी अमेठीतून नावाची घोषणा केली नाही तर मी..."; काँग्रेस नेत्याने उचललं टोकाचं पाऊल
20
महाराष्ट्र दिनानिमित्त पूजा सावंतची खास पोस्ट, "छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती ऑस्ट्रेलियात..."

सेंद्रिय कृषीमालाला नाशिककरांची पसंती, कृषिमहोत्सवात शहरवासियांचा खरेदीला प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 09, 2019 6:01 PM

शेतकऱ्यांचा शेतीमाल थेट ग्राहकांनी खरेदी करावा, तसेच ग्राहकांनाही रास्त दरात आणि ताजा शेतमाल उपलब्ध झाला तर शेतकऱ्यांचीही पारंपरिक बाजार व्यवस्थेत होत असलेली कु चंबणा थांबण्यास मदत होईल. त्याचप्रमाणे शेतकरी आणि ग्राहक यांच्यात ओळख निर्माण होऊन कायमस्वरूपी शेतीमालासाठी ग्राहक उपलब्ध होतील, या उद्देशाने नाशिक शहरात सुरू असलेल्या कृषिमहोत्सवात पहिल्या दिवसापासून शहरवासीय व शेतकºयांची गर्दी होत आहे.

ठळक मुद्दे नाशिककरांचा पारंपारिक पद्धतीने उत्पादिक कृषी मालाला पसंतीसेंद्रीय अन्नधान्य, कडधान्य खरेदीला ग्राहकांचे प्राधान्यजिल्हा कृषी महोत्सवाला शहरवासियांचा प्रतिसाद

नाशिक : शेतकऱ्यांचा शेतीमाल थेट ग्राहकांनी खरेदी करावा, तसेच ग्राहकांनाही रास्त दरात आणि ताजा शेतमाल उपलब्ध झाला तर शेतकऱ्यांचीही पारंपरिक बाजार व्यवस्थेत होत असलेली कु चंबणा थांबण्यास मदत होईल. त्याचप्रमाणे शेतकरी आणि ग्राहक यांच्यात ओळख निर्माण होऊन कायमस्वरूपी शेतीमालासाठी ग्राहक उपलब्ध होतील, या उद्देशाने नाशिक शहरात सुरू असलेल्या कृषिमहोत्सवात पहिल्या दिवसापासून शहरवासीय व शेतकऱ्यांची गर्दी होत आहे.कृषी विभाग आणि आत्मा यांच्या वतीने ७ फेब्रुवारी ते ११ फेब्रुवारीदरम्यान सुरू असलेल्या कृषी महोत्सवामध्ये शनिवारी शेतकरी व व्यापाऱ्यांसाठी विक्रेता व खरेदीदार मार्गदर्शन कार्यशाळेच्या माध्यमातून संवाद घडवून आणण्यात आला. दरम्यान, ग्राहकांनी महोत्सवामध्ये सेंद्रिय अन्नधान्यासह फळभाज्या व पालेभाज्या खरेदीला पसंती दिली असून, अन्नधान्यांमध्ये ग्राहकांना गावरान व सेंद्रिय पद्धतीने उत्पादित केलेल्या तांदूळ, बाजरी, नागली, वरई, गहू यांसह विविध प्रकारच्या डाळी आणि कडधान्य खरेदीला नाशिककरांडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. विशेष म्हणजे या कृषिमहोत्सवाला भेट देणाऱ्या नाशिककरांमध्ये बहुतांश नागरिकांनाच शेतीतील आधुनिक तंत्रज्ञान पाहण्यापेक्षा योग्य दरात मिळणारा कृषीमाल खरेदीक डेच अधिक कल असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, कृषिमहोत्सवाला ग्राहकांचा प्रतिसाद मिळतो आहे. गावाकडे शेती उत्पादनाला ग्राहक मिळत नाही. त्यामुळे अनेकदा माल पडून राहतो, नाही तर मिळेल त्या भावात विक्री करावी लागते. परंतु कृषी महोत्सवाच्या माध्यमातून पारंपरिक कृषी उत्पादनाला ग्राहकांची चांगली मागणी आहे. या महोत्सवात आम्ही गरी कोळपी तांदळासह आणखी काही उत्पादने विक्रीसाठी ठेवली असून, नाशिकरांकडून गरी कोळपी तांदळाला मोठ्या प्रमाणात मागणी मिळते असल्याचे जातेगाव येथील तांदूळ विक्रेता किरण कांडेकर यांनी सांगितले. 

समाज कल्याण, कृषी विभागाचा देखावाकृषिमहोत्सवात शेतकऱ्यांसाठी सरकारच्या विविध योजनांसोबतच कृषिपूरक उद्योग आणि आधुनिक तंत्रज्ञानाचे मार्गदर्शन करण्यासाठी शासनाच्या विविध विभागांनी स्टॉल्स लावले आहेत. यातील नाशिक जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने लावलेल्या स्टॉलवर विभागातर्फे शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांविषयी माहिती देण्यासाठी कोणीही अधिकारी उपस्थित नाही. तसेच कोणत्याही योजनांचे माहितीपत्रक उपलब्ध नसल्याने स्टॉल केवळ देखाव्यासाठी उभा केला का असा सवाल असल्याने येणाºया शेतकऱ्यांना कोणतीही माहिती मिळू शकली नाही. तर कृषी विभागाने निर्यातक्षम कृषी उत्पादनांचे प्रदर्शन मांडले आहे. परंतु शेतकऱ्यांनी संबंधित उत्पादनांची माहिती विचारली तर कृषी विभागाचे अधिकारी संबंधित शेतकऱ्यांचे नाव आणि मोबाइल नंबर देऊन आम्हाला उत्पादनांविषयी माहिती नसल्याचे सांगत असल्याने या कृषी महोत्सवात कृषी विभागासोबतच समाज कल्याण विभागाचीही उदासीनता दिसून आली. 

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रNashikनाशिकagricultureशेतीFarmerशेतकरीMarketबाजारsaleविक्री