सिन्नर महाविद्यालयात अवयवदान जनजागृती कार्यक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2020 17:35 IST2020-01-07T17:35:40+5:302020-01-07T17:35:54+5:30
सिन्नर : येथील गुरुवर्य मामासाहेब दांडेकर कला, भगवंतराव वाजे वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाद्वारे अवयवदान जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला.

सिन्नर महाविद्यालयात अवयवदान जनजागृती कार्यक्रम
सिन्नर : येथील गुरुवर्य मामासाहेब दांडेकर कला, भगवंतराव वाजे वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाद्वारे अवयवदान जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला.
प्राचार्य दिलीप शिंदे यांनी प्रास्ताविकात अवयवदान हे श्रेष्ठ दान असल्याचे स्पष्ट केले. अवयव दानाविषयी जाणीव होणे महत्त्वाचे असून त्याबरोबर अवयवदानात प्रत्यक्ष सहभाग महत्त्वाचा असल्याचे त्यांनी सांगितले. अवयव दानाविषयी चे गैरसमज दूर करून या महान कार्यासाठी प्रेरित झाले पाहिजे असे त्यांनी स्पष्ट केले. व्यासपीठावर मार्गदर्शक डॉ. भाऊसाहेब मोरे, सुनील देशपांडे, अशोक सोनवणे, शैलेश देशपांडे, नारायण म्हैस्कर, उपप्राचार्य आर. व्ही. पवार, शकुंतला गायकवाड आदी उपस्थित होते.
अशोक सोनवणे यांनी लोक अवयवदान सोडून इतर सर्व प्रकारचे दान करतात मात्र अवयवदानासाठी लोक घाबरतात या विषयाची भीती मनातून काढून या पवित्र कार्याबाबत समाजाला जागे केले पाहिजे अवयव दाना बाबत च्या डॉ. मोरे यांच्या पदयात्रेमुळे मोठे समाजकार्य होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
डॉ. सुनील देशपांडे यांनी बाबा आमटे यांनी काळाची गरज ओळखून अवयव दान बाबत कार्य सुरू केल्याचे सांगितले तेच कार्य पुढे नेण्यासाठी अवयवदान पदयात्रेचा मुख्य उद्देश आहे. देह जाळून टाकताना सोने काढून घेतात तर अमुल्य अवयव जाळून टाकतात त्यापेक्षा त्यांचे अवयव दान केल्यास महान कार्य घडेल.
डॉ. भाऊसाहेब मोरे यांनी जेव्हा आपल्या कुटुंबातच एखाद्या व्यक्तीला अवयवांचे गरज भासते. तेव्हा या दानाची गंभीरता लक्षात येते. निरपेक्ष भावनेने अवयवदान करणे गरजेचे आहे. अंधश्रद्धा दूर करून अवयव दान चळवळीत भाग घेतला पाहिजे असे त्यांनी स्पष्ट केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रा. योगेश भारस्कर यांनी केले. कार्यक्र माला प्रा. एस. जी. भागवत, प्रा एन के जाधव प्रा. दीपक खुर्चे व डॉ यु ए पठाडे, एन एस एस स्वयंसेवक, यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते.