सामान्य कलावंत, तंत्रज्ञांनाची मदतीसाठी मुख्यमंत्र्यांना साकडे !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:13 IST2021-07-17T04:13:08+5:302021-07-17T04:13:08+5:30

नाटकांमध्ये किंवा मालिकांमध्ये केवळ मोठेच कलावंत भाग घेतात त्यांना पैशाची ददात नसते, हा एक गैरसमज आहे. नाटकात बॅकस्टेजवर काम ...

Ordinary artists, technicians to help CM! | सामान्य कलावंत, तंत्रज्ञांनाची मदतीसाठी मुख्यमंत्र्यांना साकडे !

सामान्य कलावंत, तंत्रज्ञांनाची मदतीसाठी मुख्यमंत्र्यांना साकडे !

नाटकांमध्ये किंवा मालिकांमध्ये केवळ मोठेच कलावंत भाग घेतात त्यांना पैशाची ददात नसते, हा एक गैरसमज आहे. नाटकात बॅकस्टेजवर काम करणाऱ्यांपासून पडेल ती भूमिका, काम करणारे हजारो रंगकर्मी आहेत. या सर्वांना नाटक किंवा मालिका असेल तर राेजंदारीवर काम दिले जाते. त्यामुळे त्यांचा आणि त्यांच्या कुटुंबाचा चरितार्थ पूर्णपणे त्यावरच अवलंबून असतो. अशा परिस्थितीत अजून किती काळ असे रोजंदारीवरचे कलाकार, तंत्रज्ञ, कामगारांना उपासमार सहन करावी लागणार, तेदेखील सांगता येत नाही. त्यामुळे या प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी स्वत:च लक्ष घालून रोजंदारीवरील कलावंतांना, तंत्रज्ञांनाची आर्थिक मदत उपलब्ध करून देण्याची गरज असल्याचे निवेदनात नमूद केले आहे. नाट्य परिषदेच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनावर नाशिक शाखेचे अध्यक्ष रवींद्र कदम आणि सचिव सुनील ढगे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

इन्फो

‘रंगभूमी सुरू करा’ हॅशटॅग !

आपण जर माझ्या मताशी सहमत असाल तर कृपया आज रंगभूमी सुरू करा हा हॅशटॅग वापरून आपली सहमती जाहीर पद्धतीने समाजमाध्यमांवर आपल्या नाटकाच्या एखाद्या फोटो आणि व्हिडिओसह सुरू करावा. तसेच त्याबरोबरच राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सांस्कृतिक मंत्री यांनादेखील टॅग करण्याचे आवाहन करणारा संदेशदेखील समाजमाध्यमांवर सध्या जोरात व्हायरल होत आहे. त्या माध्यमातूनही रंगकर्मी आपली व्यथा शासन, प्रशासनापुढे मांडण्याचा प्रयास करीत आहेत.

Web Title: Ordinary artists, technicians to help CM!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.