बारा बलुतेदारांच्या प्रशिक्षण केंद्राचा प्रस्ताव सादर करण्याचा आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 04:41 IST2020-12-17T04:41:08+5:302020-12-17T04:41:08+5:30
बारा बलुतेदारांच्या जिल्ह्यातील विविध संघटनांनी यासंदर्भात खासदार हेमंत गोडसे यांची भेट घेत व्यवसायाविषयीच्या व्यथा मांडल्या होत्या. बारा बलुतेदारांना उभारी ...

बारा बलुतेदारांच्या प्रशिक्षण केंद्राचा प्रस्ताव सादर करण्याचा आदेश
बारा बलुतेदारांच्या जिल्ह्यातील विविध संघटनांनी यासंदर्भात खासदार हेमंत गोडसे यांची भेट घेत व्यवसायाविषयीच्या व्यथा मांडल्या होत्या. बारा बलुतेदारांना उभारी देण्यासाठी त्यांच्या व्यवसायाचे अत्याधुनिक प्रशिक्षण मिळणे गरजेचे असल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली. त्यानुसार गोडसे यांनी एका शिष्टमंडळासह नागपूर येथे केंद्रीय मंत्री गडकरी यांची भेट घेतली होती. नाशिक शहरालगतच्या त्र्यंबक रोडवर खादी ग्रामोद्योग मंडळाची २६२ एकर असलेल्या जागेवर बारा बलुतेदारांच्या लघु व्यावसायिकांना व्यवसायाला चालना मिळण्यासाठी ‘रिसर्च ॲण्ड ट्रेनिंग सेंटर’ उभारण्यात यावे, अशी आग्रही मागणी करण्यात आली होती. या मागणीनुसार गडकरी यांनी मंत्रालयातील प्रशासनाची बैठक घेत विशेष उपाय योजनांविषयी चर्चा केली. बारा बलुतेदारांच्या व्यवसायाला सर्वत्र घरघर लागली असून, यातून सावरण्यासाठी त्यांना त्यांच्या लघु व्यवसायाचे अत्याधुनिक प्रशिक्षण देणे अत्यंत गरजेचे झाले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते. यातूनच दोन दिवसांपूर्वी गडकरी यांनी प्रशासनाला प्रस्तावित प्रशिक्षण केंद्राविषयीचा प्रस्ताव लवकराच तयार करण्याच्या सूचना केल्या आहेत.