मनपात अनुकंपा भरतीबाबत लवकरच आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:12 IST2021-06-02T04:12:36+5:302021-06-02T04:12:36+5:30

महापालिकेतील मृत झालेल्या कामगारांच्या सुमारे दोनशेहून अधिक वारसांना अनुकंपा तत्त्वावर नोकरीत सामावून घेण्याचा प्रश्न गेल्या सात ते आठ वर्षांपासून ...

Order soon regarding compassionate recruitment in Manpat | मनपात अनुकंपा भरतीबाबत लवकरच आदेश

मनपात अनुकंपा भरतीबाबत लवकरच आदेश

महापालिकेतील मृत झालेल्या कामगारांच्या सुमारे दोनशेहून अधिक वारसांना अनुकंपा तत्त्वावर नोकरीत सामावून घेण्याचा प्रश्न गेल्या सात ते आठ वर्षांपासून प्रलंबित आहे. शासनाने सरसकट सर्व वारसांना नोकरीत सामावून घ्यावे, असा आदेश काढला आहे. त्यामुळे शासनाच्या आदेशानुसार ही भरती त्वरित व्हावी, अशी मागणी शिवसेनेच्या शिष्टमंडळाने आयुक्त कैलास जाधव यांची प्रत्यक्ष भेट घेऊन केली. या मुद्द्यावर आयुक्तांशी सविस्तर चर्चाही झाली. अनुकंपा भरतीसंदर्भात आलेल्या अर्जाच्या छाननीनंतर वारसांच्या निश्चितीचे काम पूर्ण झाले असून एक-दोन दिवसांत या भरतीबाबतचे आदेश पारित होतील, असे आश्वासन आयुक्तांनी दिल्याचेही गीते यांनी सांगितले. आयुक्तांशी झालेल्या चर्चेत महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, गटनेते विलास शिंदे, माजी जिल्हाप्रमुख सुनील बागूल, दत्ता गायकवाड, माजी महापौर विनायक पांडे आदींचा समावेश होता.

Web Title: Order soon regarding compassionate recruitment in Manpat