जिल्हा परिषदेत आढळले २१ लेटलतिफ एक दिवसाचे वेतन कपातीचे अध्यक्षांचे आदेश
By Admin | Updated: November 21, 2014 01:01 IST2014-11-21T00:11:05+5:302014-11-21T01:01:48+5:30
जिल्हा परिषदेत आढळले २१ लेटलतिफ एक दिवसाचे वेतन कपातीचे अध्यक्षांचे आदेश

जिल्हा परिषदेत आढळले २१ लेटलतिफ एक दिवसाचे वेतन कपातीचे अध्यक्षांचे आदेश
नाशिक : जिल्हा परिषदेच्या सात विभागांमधील तब्बल २१ कर्मचारी जागेवर नसल्याचे आढळून आल्याने त्यांचे एक दिवसाचे विना वेतन करण्याचे आदेश जिल्हा परिषद अध्यक्ष विजयश्री चुंबळे यांनी प्रशासनाला दिले आहेत. सकाळी साडेदहा वाजता विजयश्री चुंबळे यांनी सामान्य प्रशासन विभाग, कृषी, पशुसंवर्धन, लघु पाटबंधारे (पश्चिम) विभाग, बांधकाम विभाग-१, प्राथमिक शिक्षणाधिकारी कार्यालय, ग्रामपंचायत, समाजकल्याण अर्थ आदि विभागात भेटी दिल्या. या भेटीत या सातही विभागांत जागेवर नसलेले व मस्टरवर स्वाक्षरी नसलेले एकूण २१ कर्मचारी आढळले. त्यांची नावे व विभाग पुढीलप्रमाणे- सामान्य प्रशासन- परिचर- प्रकाश वाघ, अर्थ विभाग- कनिष्ठ सहायक लेखा एम. पी. टोपले, कनिष्ठ लेखाधिकारी व्ही. सी. उघडे, सहायक लेखाधिकारी आर. बी. डुकले, पशुसंवर्धन विभाग- कक्ष अधिकारी योगेश (बापू) गोसावी, बांधकाम विभाग-१- सहायक लेखाधिकारी डी. व्ही. लाड, स्थापत्य अभियंता सहायक- जी. एस. पवार, कनिष्ठ सहायक आर. व्ही. दंडगव्हाळ, वरिष्ठ यांत्रिकी एस. एम. पवार, ग्रामपंचायत विभाग- वरिष्ठ सहायक जे. सी. सोनार, जलस्वराज्य प्रकल्प- तज्ज्ञ शामला चव्हाण, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग- वरिष्ठ सहायक व्ही. यू. चव्हाण, कनिष्ठ आरेखक एम. ए. सातपुते, स्थापत्य अभियंता सहायक व्ही. ए. देशमुख व एस. व्ही. सांगळे, कनिष्ठ अभियंता व्ही. ए. वाघ व एस. टी. सूर्यवंशी, वेतन पडताळणी पथक- वरिष्ठ सहायक पी. आर. शेलार व कनिष्ठ सहायक एम. पी. वाघमारे, लघु पाटबंधारे विभाग (पश्चिम)- कार्यालयीन अधीक्षक श्रीमती छाया पाटील व कनिष्ठ आरेखक गणेश गांगुर्डे आदि २१ कर्मचारी गैरहजर आढळल्याने त्यांच्याकडून तत्काळ खुलासा मागवून त्यांचे एक दिवसाचे वेतन कपात करण्यात यावे व आपल्याला अहवाल सादर करावा, असे आदेश विजयश्री चुंबळे यांनी सामान्य प्रशासन विभागाला दिले आहेत. (प्रतिनिधी)