आयुक्तांनी दिले आदेश
By Admin | Updated: July 29, 2016 00:14 IST2016-07-29T00:03:10+5:302016-07-29T00:14:18+5:30
ना हरकत दाखले मिळणार आॅनलाइन

आयुक्तांनी दिले आदेश
नाशिक : महापालिकेच्या अग्निशामक दलातील सबस्टेशन आॅफिसर राजेंद्र बैरागी यास ‘ना हरकत दाखला’ देण्याकरिता पाच हजारांची लाच मागितल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडल्यानंतर आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी साऱ्या प्रकरणाची तत्काळ गंभीर दखल घेत यापुढे ‘ना हरकत दाखले’ आॅनलाइनच्या माध्यमातून देण्याचे आदेश दिले आहेत.
गुरुवारी अग्निशामक दलातील अधिकाऱ्यास लाच घेताना पकडल्यानंतर अभिषेक कृष्ण यांनी मुख्य अग्निशामक अधिकारी अनिल महाजन यांच्याशी चर्चा केली आणि ‘ना हरकत दाखले’ आॅनलाइन उपलब्ध करून देण्याचे आदेशित केले. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना आयुक्तांनी सांगितले, सदर घटना अतिशय दुर्दैवी आणि महापालिकेच्या प्रतिमेला काळिमा फासणारी आहे. त्यामुळे आॅटो डिसीआर, आॅनलाइन टीडीआर प्रमाणेच अग्निशामक दलाकडून देण्यात येणारे विविध प्रकारचे दाखलेही आॅनलाइन उपलब्ध करून दिले जाणार आहेत. त्यासाठी संगणक विभागाला तातडीने व्यवस्था करण्याचे आदेशित केले आहे. नागरिकांच्या हक्कमध्येही आता या दाखल्यांचा समावेश असल्याने नागरिकांनी