तहसीलदाराकडून परस्पर जागा वाढवण्याचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2019 01:44 AM2019-12-20T01:44:36+5:302019-12-20T01:44:54+5:30

देवळा तहसीलदाराने परस्पर जमिनीचे क्षेत्र वाढवून दिल्याची तक्रार उदयकुमार आहेर यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली असून, तहसीलदारांना तत्काळ निलंबित करण्यात यावे, अशी मागणी केली आहे.

Order to increase mutual space by tahsildar | तहसीलदाराकडून परस्पर जागा वाढवण्याचे आदेश

तहसीलदाराकडून परस्पर जागा वाढवण्याचे आदेश

Next
ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार : निलंबनाची मागणी

नाशिक : देवळा तहसीलदाराने परस्पर जमिनीचे क्षेत्र वाढवून दिल्याची तक्रार उदयकुमार आहेर यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली असून, तहसीलदारांना तत्काळ निलंबित करण्यात यावे, अशी मागणी केली आहे.
यासंदर्भात आहेर यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, देवळा नगरपंचायतीचे नगरसेवक अशोक देवराम आहेर यांनी सर्व्हे नंबर ३ वर १.५ आर इतके अतिक्रमण केल्याबाबत जिल्हाधिकाºयांकडे तक्रार करण्यात आल्यावर त्याची चौकशी होऊन आहेर यांचे नगरसेवकपद रद्द करण्यात आले आहे.
अशोक आहेर यांनी सर्व्हे नंबर २/१अ मधील २३.३ आर पैकी २२.३ आर इतके क्षेत्र मूळ मालकाकडून विकत घेतले आहे. त्यामुळे त्यांनी शासकीय जमिनीवर अतिक्रमण केल्याचे सिद्ध झाले होते. सातबारा उताºयावर अशोक आहेर यांच्या
नावे २२.३ क्षेत्र असून, त्यांच्या खरेदी खतातदेखील तशी नोंद आहे. त्यामुळे उर्वरित ०१.०० आर
जागा कायद्याने मूळ मालकाकडे आहे.
त्यामुळे अतिक्रमित असलेली शासकीय जमीन खासगी व्यक्तीच्या घशात घालण्याचे काम तहसीलदारांनी केले असून, त्यांच्यावर तत्काळ निलंबनाची कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही शिवसंग्राम युवक आघाडीचे प्रदेश अध्यक्ष उदयकुमार आहेर यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी पुराव्यांची कागदपत्रेही जोडली आहेत.
बेकायदेशीर आदेश
अशोक आहेर यांचे नगरसेवकपद अपात्र ठरल्याने त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली असून, त्याबाबतची सुनावणी सुरू असताना त्यांना मदत होण्याच्या हेतूने देवळ्याचे तहसीलदार दत्तात्रय शेजुळ यांनी बेकायदेशीरपणे अशोक आहेर यांची जमीन २२.३ ऐवजी २३.३ इतकी वाढवून दिली आहे

Web Title: Order to increase mutual space by tahsildar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.