मागणी : स्वसुरक्षेचा शिक्षणक्रमात समावेश करावा

By Admin | Updated: August 23, 2016 00:52 IST2016-08-23T00:50:45+5:302016-08-23T00:52:06+5:30

शालेय विद्यार्थिनींची जनजागृती फेरी

Order: Include self-defense in the curriculum | मागणी : स्वसुरक्षेचा शिक्षणक्रमात समावेश करावा

मागणी : स्वसुरक्षेचा शिक्षणक्रमात समावेश करावा

नाशिक : शाळा-महाविद्यालयांच्या शिक्षणक्रमात स्वसुरक्षा आणि व्यक्तिमत्त्व विकास या विषयांचा समावेशाच्या मागणीसाठी विश्व हिंदू परिषद व दुर्गावाहिनीच्या वतीने जनजागृतीसाठी फेरी काढली.
अशोकस्तंभावरील विश्व हिंदू परिषदेच्या कार्यालयापासून सुरुवात झालेल्या या फेरीचे उद््घाटन विहिंपचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष एकनाथ शेटे यांनी केले. यावेळी नाना गोविलकर, रमेश गायधनी व बालाजी प्रतिष्ठानच्या श्रीमती मुदलीयार प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. सदरची फेरी अशोकस्तंभ, मेहेर, सीबीएस, डॉ. आंबेडकर पुतळा, शिवाजी रोड मार्गे शालिमार चौकातील दुर्गामाता मंदिरात नेण्यात आली. तेथे फेरीचा समारोप करण्यात आला. यावेळी अ‍ॅड. मीनल वाघ, निशा पाटील, मयुरी पवार, पार्थ, भारतभाई राव, गणेश हेकड, अश्वीन पटेल, आशिष पटेल यांच्यासह अन्य मान्यवर सहभागी झाले होते. शाळा आणि महाविद्यालयाच्या सध्याच्या शिक्षणक्रमात स्वसुरक्षेचा विषय नाही. यासाठी परिषद आणि दुर्गावाहिनीच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यात येणार असल्याचे अ‍ॅड. मीनल वाघ यांनी सांगितले.

Web Title: Order: Include self-defense in the curriculum

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.