गॅसग्राहकांचे खाते उघडण्याचे आदेश

By Admin | Updated: January 10, 2015 00:40 IST2015-01-10T00:40:36+5:302015-01-10T00:40:46+5:30

गॅसग्राहकांचे खाते उघडण्याचे आदेश

Order for gascrafts account opening | गॅसग्राहकांचे खाते उघडण्याचे आदेश

गॅसग्राहकांचे खाते उघडण्याचे आदेश

नाशिक : घरगुती गॅस सिलिंडरचे शासकीय अनुदान थेट ग्राहकांच्या बॅँक खात्यावर जमा करण्याच्या तेल कंपन्यांच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी येत्या दहा दिवसांत सर्व गॅसग्राहकांचे खाते उघडून त्यांचे अनुदान बॅँकेत जमा करण्याचे आदेश जिल्हाधिकारी विलास पाटील यांनी दिले आहेत.
शुक्रवारी या संदर्भात तेल कंपन्यांचे प्रतिनिधी व जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांची बैठक होऊन त्यात जवळपास ६० टक्के ग्राहकांनी अद्यापही खाते उघडलेले नसल्याचे स्पष्ट झाले. गॅस अनुदानाची रक्कम बॅँकेत जमा करण्याबाबत शासनाने काही निकष ठरवून दिले होते. डिसेंबर अखेर ५० टक्के ग्राहकांचे, तर जानेवारीत ९० टक्के ग्राहकांचे बॅँकेत खाते असायला हवे अशा सूचना केल्या होत्या. त्यामुळे चालू महिना अखेर ९० टक्के ग्राहकांचे खाते उघडण्यासाठी दहा दिवसांची मुदत देण्यात आली असून, ग्राहकांकडून बॅँकेची माहिती गोळा करण्यासाठी गॅस वितरकांनी स्वतंत्र व्यवस्था करावी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. जे ग्राहक बॅँक खात्याची माहिती देणार नाहीत, त्यांना शासकीय अनुदान मिळणार नसल्याचेही त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: Order for gascrafts account opening

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.