लेखापरीक्षणातील आक्षेपांचे अनुपालन करण्याचे आदेश
By Admin | Updated: December 24, 2016 01:32 IST2016-12-24T01:31:51+5:302016-12-24T01:32:07+5:30
महापालिका : आयुक्तांनी घेतली खातेप्रमुखांची बैठक

लेखापरीक्षणातील आक्षेपांचे अनुपालन करण्याचे आदेश
नाशिक : महापालिकेच्या कामकाजाबाबत महालेखाकार व स्थानिक निधी लेखापरीक्षणात घेण्यात आलेल्या आक्षेप दूर करत त्याबाबत अनुपालन महिनाभरात सादर करण्याचे आदेश आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी सर्व खातेप्रमुखांना दिले. मनपा अंतर्गत लेखापरीक्षणात ४४६६ आक्षेप नोंदविण्यात आले आहेत.
महापालिकेच्या कामकाजाबाबत महालेखाकारांनी एकूण १३० आक्षेप घेतले होते, त्यापैकी महापालिकेने ८० आक्षेपांबाबत अनुपालन सादर केले आहे. स्थानिक निधी लेखापरीक्षणात ४८३ पैकी ४१३ अनुपालन सादर झाले तर मनपा अंतर्गत लेखापरीक्षणात ४४६६ पैकी २७४ अनुपालन सादर झाले आहेत.
लेखापरीक्षण आक्षेप प्रलंबित परिच्छेद अनुपालनाबाबत आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी शुक्रवारी (दि.२३) सर्व खातेप्रमुखांची बैठक घेतली. यावेळी, आक्षेपांची माहिती घेण्यात आल्यानंतर आयुक्तांनी महालेखाकार व स्थानिक निधी लेखापरीक्षणात नोंदविण्यात आलेल्या आक्षेपांबाबत एकत्रित अहवाल तयार करून महिनाभरात अनुपालन सादर करण्याचे आदेश दिले. तसेच, महापालिकेत प्री आणि पोस्ट आॅडिट केले जात असतानाही अंतर्गत लेखापरीक्षणात मोठ्या संख्येने आक्षेप आढळून आल्याने आयुक्तांनी आश्चर्य व्यक्त केले.