शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

वसतिगृहाच्या कामाला गती देण्याचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2018 01:51 IST

जिल्ह्णात सटाणा तालुक्यातील उत्राणे येथील दिव्यांग तरुण प्रवीण कडू पगार या दिव्यांग तरुणास आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या बँक कर्मचाºयांविरोधात तत्काळ कारवाई करण्यासह, मराठा विद्यार्थी वसतिगृहाच्या कामाला वेग देण्यासाठी प्रशासनाला आदेशित करण्याच्या सूचना महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सचिवांना दिल्या आहेत. तसेच अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या कामकाजालाही गती देण्याच्या सूचना पाटील यांनी केल्याची माहिती मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी दिली आहे.

नाशिक : जिल्ह्णात सटाणा तालुक्यातील उत्राणे येथील दिव्यांग तरुण प्रवीण कडू पगार या दिव्यांग तरुणास आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या बँक कर्मचाºयांविरोधात तत्काळ कारवाई करण्यासह, मराठा विद्यार्थी वसतिगृहाच्या कामाला वेग देण्यासाठी प्रशासनाला आदेशित करण्याच्या सूचना महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सचिवांना दिल्या आहेत. तसेच अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या कामकाजालाही गती देण्याच्या सूचना पाटील यांनी केल्याची माहिती मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी दिली आहे.  नाशिकच्या मराठा क्र ांती मोर्चातील शिष्टमंडळाने मंगळवारी (दि.२८) मुंबईत महसूलमंत्री चंद्रकांत पाटील व नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांची भेट घेऊन प्रशासनाकडून मराठा समाजाच्या भावनांचा अवमान होत असल्याचे निदर्शनास आणून दिले. सटाणा तालुक्यातील उत्राणे येथील दिव्यांग तरुण प्रवीण कडू पगार यांच्यावर आत्महत्या करण्याची वेळ आणणाºया बँक कर्मचाºयांविरोधात गुन्हा दाखल करण्यासह पगार यांच्या कुटुंबातील व्यक्तीला नोकरी देण्याची मागणीही यावेळी केली. याशिवाय अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ केवळ कागदावर अस्तित्वात आहे, मराठा तरुणांना रोजगार व स्वयंरोजगारासाठी कोणतीही आर्थिक मदत मिळालेली नसून मराठा विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह बांधण्याची घोषणा झाल्यानंतरही कारवाई होत नसल्याचे शिष्टमंडळाने चंद्रकांत पाटील व गिरीश महाजन यांच्या निदर्शनास आणून दिले. त्यामुळे मराठा समाजाच्या शिष्टमंडळाने मांडलेल्या समस्यांवर जिल्हा प्रशासनाने तत्काळ कारवाई करण्यासठी आदेशित करण्याच्या सूचना चंद्रकांत पाटील यांनी सचिवांना दिल्या आहेत. या शिष्टमंडळात माजी आमदार माणिकराव कोकाटे, करण गायकर, तुषार जगताप, अमित जाधव, राजेश मोरे, तानाजी गायकर आदींचा सहभाग होता.गणेशोत्सवापूर्वी वसतिगृहाचे भूमिपूजनमराठा समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी बांधल्या जाणाºया वसतिगृहाच्या जागेचा प्रश्न मार्गी लागला असून, सप्टेंबरमध्ये गणेशोत्सवापूर्वी गंगापूररोड परिसरातील जागेवर भूमिपूजन करण्याचा मानस पालकमंत्री गिरीश महाजन यांनी मराठा समन्वयकांशी बोलताना व्यक्त केला. त्यामुळे दि. ८ किंवा १० सप्टेंबर रोजी मराठा विद्यार्थी वसतिगृहाचे भूमिपूजन होण्याची शक्यता असल्याची माहिती नाशिक मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी दिली आहे.

टॅग्स :marathaमराठाGirish Mahajanगिरीश महाजन