शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
2
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
3
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
4
मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार
5
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
6
दुसऱ्यांचा विनाश करणे हा धर्म नाही अधर्म आहे, शिक्षा झालीच पाहिजे - प्रेमानंद महाराज
7
‘पत्नीचे अनेक तरुणांशी अनैतिक संबंध, नशेच्या धुंदीत घालतात धिंगाणा, करतात अश्लील चाळे ’, पतीचे गंभीर आरोप, पुरावेही दिले   
8
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
9
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
10
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
11
जिद्द असावी तर अशी! अंगणवाडी ते IAS अधिकारी; ३ वेळा अपयश, मानली नाही हार, रचला इतिहास
12
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान
13
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
14
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
15
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
16
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
17
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
18
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
19
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
20
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'

वॉटर पार्कला धरणातून पाणी देण्यास विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2019 16:40 IST

शेतकरी एकवटले : अंजेनेरी येथे बैठकीत निर्धार

ठळक मुद्दे एकाही नवीन शेतक-यांना पाणी उचलण्यासाठी परवानगी दिली जात नसताना खाजगी व्यवसायास १० टक्के एवढ्या मोठ्या प्रमाणात पाणी वापराची परवानगी दिली गेल्याने शेतक-यांनी संताप व्यक्त केला.

त्र्यंबकेश्वर : यंदा दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर गावकऱ्यांना टंचाई काळात पिण्याच्या पाण्यासह सिंचनासाठी नितांत आवश्यकता असतांनाही तालुक्याच्या पूर्व भागात असलेल्या एकमेव अंजनेरी प्रकल्पातून जवळच असलेल्या वॉटर पार्कसाठी पाणी आरक्षित करण्यात आल्याचा आरोप करत स्थानिक शेतक-यांनी धरणातून पाणी देण्यास तिव्र विरोध दर्शविला आहे.परिसरातील शेकडो शेतक-यांनी अंजेनेरी येथे बैठक घेत या पाणीवाटपास विरोध दर्शविला आहे. बैठकीत खाजगी व्यवसायास पाणी देण्यास तीव्र विरोध करत हक्काचे पाणी न देण्याचा निर्धार शेतक-यांनी केला. यावेळी ज्येष्ठ नेते मधुकर लांडे, सरपंच राजू बदादे, गोविंद चव्हाण, राजाराम चव्हाण, धोंडीराम चव्हाण, नामदेव चव्हाण, गणेश चव्हाण, चंदू चव्हाण, अंबादास चव्हाण, कचरु निंबेकर, अशोक चव्हाण, गोटीराम करंडे, मुरलीधर महाले, दिलीप शिंदे, निवृत्ती चव्हाण आदी उपस्थित होते. तालुक्यातील पूर्व भागास एकमेव असलेल्या अंजेनेरी धरणावर अनेक गावातील शेतीसह पिण्याचे पाणी अवलंबून आहे. पाच वर्षा पूर्वीच येथील धरणावर शेतक-यांची पाणी सोसायटी सुरु झाली असून त्यानंतर एकाही नवीन शेतक-यांना पाणी उचलण्यासाठी परवानगी दिली जात नसताना खाजगी व्यवसायास १० टक्के एवढ्या मोठ्या प्रमाणात पाणी वापराची परवानगी दिली गेल्याने शेतक-यांनी संताप व्यक्त केला.रितसर शासनाची परवानगी अंजेनेरी प्रकल्पातून पिण्यासाठी १५टक्के, औद्योगिकसाठी १० टक्के तर सिंचनासाठी ७५ टक्के पाणी आरक्षित आहे. त्यानुसार, औद्योगिक वापरासाठी असलेल्या आरक्षणातून शुभम वॉटर वर्ल्ड योजनेला ०.००५४७५ दलघमी इतकेच पाणी आरक्षित झालेले आहे आणि ते रितसर शासनाची परवानगी घेऊन झालेले आहे. इतरही योजनांसाठी औद्योगिक आरक्षणातील पाणी मिळू शकते. परंतु, केवळ राजकीय हेतूने वॉटर पार्कसाठीच्या पाण्याला विरोध केला जात आहे. काही शेतक-यांकडून तर सिंचनासाठी पाणी न वापरता नर्सरीला पाणी विक्री केले जात आहे.- शशिकांत जाधव, संचालक, शुभम वॉटर पार्क

टॅग्स :Nashikनाशिकdam tourismधरण पर्यटन