जलवाहिनीला पाणी देण्यास विरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2017 00:09 IST2017-08-06T23:53:11+5:302017-08-07T00:09:14+5:30
कळवण तालुक्यातील पुनंद धरणातून सटाण्यातील जलवाहिनीला पाणी देण्यास विरोध होत असून, यासाठी शनिवारी शेतकरी मेळावा घेण्यात आला. सटाणा पालिकेला पाणी देण्यास व जलवाहिनी टाकण्यास कळवण तालुका व पुनंद खोºयातील शेतकºयांचा तीव्र विरोध असून, शनिवारी पिळकोस, विसापूर, भादवण, बिजोरे, खामखेडा, सावकी, चाचेर यांसह सुळे डाव्या कालव्याच्या लाभक्षेत्रातील शेतकरी, सरपंच, सोसायटी सभापती, तरुण शेतकरी, लोकप्रतिनिधींनी एकत्र येत शेतकरी मेळावा घेतला.

जलवाहिनीला पाणी देण्यास विरोध
पिळकोस : कळवण तालुक्यातील पुनंद धरणातून सटाण्यातील जलवाहिनीला पाणी देण्यास विरोध होत असून, यासाठी शनिवारी शेतकरी मेळावा घेण्यात आला. सटाणा पालिकेला पाणी देण्यास व जलवाहिनी टाकण्यास कळवण तालुका व पुनंद खोºयातील शेतकºयांचा तीव्र विरोध असून, शनिवारी पिळकोस, विसापूर, भादवण, बिजोरे, खामखेडा, सावकी, चाचेर यांसह सुळे डाव्या कालव्याच्या लाभक्षेत्रातील शेतकरी, सरपंच, सोसायटी सभापती, तरुण शेतकरी, लोकप्रतिनिधींनी एकत्र येत शेतकरी मेळावा घेतला.
या मेळाव्यात मानूर गटाच्या जिल्हा परिषद सदस्य भारती पवार, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष गोविंद पगार, तालुकाध्यक्ष रामकृष्ण जाधव, शांताराम जाधव, सखाराम वाघ, मोहन जाधव, अण्णा शेवाळे, बाजीराव गुंजाळ, प्रवीण रौंदळ, दादाजी बोरसे यांनी उपस्थित शेतकºयांना मार्गदर्शन केले. दरम्यान, रक्त सांडावे लागले तरी चालेल पण परिसरातील एकही शेतकरी आपल्या शेतातून सटाणा शहरासाठी जाणारी पाइपलाइन खोदू देणार नाही, अशी शपथ सर्व शेतकºयांनी घेतली. जलवाहिनीला विरोध करण्यासाठी पुनंद सुळे कालवा संघर्ष कृती समितीचे गठन करण्यात आले. बैठकीत पुढील आंदोलनाची दिशा ठरविण्यात आली. जलवाहिनीस परिसरातील सर्व गावांचा व शेतकºयांचा विरोध असून, स्थापन करण्यात आलेल्या समितीला पाठिंबा दर्शविण्यात आला. सटाणा शहरवासीयांचा नैसर्गिक हक्क हा केळझर धरणावर असून, त्यांना कळवण तालुक्यातील धरणातील पाणी हे पाइपलाइनद्वारे कदापिही जाऊ दिले जाणार
नाही. यासाठी शेतकरी शेतात पाइपलाइन खोदू देणार नाहीत. जर शासनाला सटाणा शहरवासीयांना पाणी द्यायचे असल्यास ते कालव्याद्वारे किंवा नदीद्वारे द्यावे, अशी भूमिका शेतकºयांनी मांडली आहे. अन्यथा आज या आंदोलनाची ठिणगी पडली आहे त्या ठिणगीचे आगीत रूपांतर होण्यास वेळ लागणार नाही, असा इशारा यावेळी शेतकºयांनी दिला आहे. याविरोधात आंदोलना स शेतकºयांनी तयार रहावे असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष गोविंद पगार यांनी आपल्या मनोगतात यावेळी सांगितले. यावेळी पुनद डावा कालव्यावर अवलंबून असलेल्या गावातील शेतकºयांच्या उपस्थितीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष रामकृष्ण जाधव ,शांताराम जाधव,आण्णा शेवाळे यांनी या लढाची पुढील आखणी केली असून येत्या १५ आॅगस्ट ला या कालव्यावर अवलंबून असलेल्या गावातील ग्रामपंचायत ,सोसायटी व विविध संघटनांचे ठराव केले जाणार आहेत. जिल्हाधिकारी व शासनदरबारी याचा पाठपुरावा करण्यासाठी पुनद दावा कालवा संघर्ष समतिी गठन करून मोहन जाधव , सखाराम वाघ ,कारभारी पवार ,बाजीराव गुंजाळ , प्रल्हाद गुंजाळ रवींद्र गुंजाळ, दीपक गुंजाळ, हेमंत गुंजाळ ,या तरु ण शेतकº्यांची या समितीवर नेमणूक करण्यात आली आहे.