गावठाण विकासाच्या कामाला विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2020 10:52 PM2020-07-11T22:52:14+5:302020-07-12T01:55:01+5:30

स्मार्ट सिटीच्या गावठाण विकास योजनेअंतर्गत धुमाळ पॉइंट वंदे मातरम चौक ते दहीपुलाच्या दरम्यान गटार योजनेचे काम करण्यात येणार आहे. तथापि, सध्या सुरू झालेला पावसाळा आणि कंपनीच्या कामाचा आवाका, अधिकाऱ्यांचे अज्ञान बघता सदरची कामे तातडीने थांबविण्याची मागणी कंपनीचे संचालक आणि कॉँग्रेस पक्षाचे गटनेते शाहू खैरे यांनी केली आहे.

Opposition to village development work | गावठाण विकासाच्या कामाला विरोध

गावठाण विकासाच्या कामाला विरोध

Next
ठळक मुद्देशाहू खैरे यांचे पत्र। स्मार्ट सिटी-मनपा अधिकाऱ्यांची बैठक घेण्याची मागणी

नाशिक : स्मार्ट सिटीच्या गावठाण विकास योजनेअंतर्गत धुमाळ पॉइंट वंदे मातरम चौक ते दहीपुलाच्या दरम्यान गटार योजनेचे काम करण्यात येणार आहे. तथापि, सध्या सुरू झालेला पावसाळा आणि कंपनीच्या कामाचा आवाका, अधिकाऱ्यांचे अज्ञान बघता सदरची कामे तातडीने थांबविण्याची मागणी कंपनीचे संचालक आणि कॉँग्रेस पक्षाचे गटनेते शाहू खैरे यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी शुक्रवारी (दि.१०) महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांना पत्र दिले आहे. अर्थात, स्मार्ट सिटी कंपनीने सदरचे काम अवघे दोन महिन्यांत पूर्ण करून परिसरातील नागरिक आणि व्यापाºयांना दिलासा देण्यासाठी काम करण्यात येणार असल्याचे म्हटले आहे.
स्मार्ट सिटीची कामे नेहमीच वादग्रस्त ठरली आहेत. त्र्यंबकनाका ते अशोकस्तंभ हा स्मार्टरोड गेल्या दोन ते तीन वर्षांपासून गाजत आहे. अवघा एक किलोमीटरचा रस्ता पूर्ण करण्यासाठी दोन वर्षांपेक्षा अधिक काळ लागला आणि खर्चदेखील सतरा कोटींच्या वर गेला आहे. त्यानंतरदेखील अपेक्षित काम पूर्ण झालेले नाही. त्यानंतर गेल्यावर्षी मध्येच कंपनीने गावठाण विकासाची कामे हाती घेतली आहेत. त्यात रस्त्याची विकासकामे सुरू झाली असून, आता वंदेमातरम चौक ते दहीपुलाच्या दरम्यान गटारी बदलण्याचे काम करण्यात येणार आहे. त्यासाठी कंपनीने नियोजन केल्यानंतर पोलीस यंत्रणेनेदेखील अधिसूचना जारी केली आहे. तथापि, आता या कामविषयी शंका व्यक्त केली जात असतानाच आता हे काम तातडीने थांबविण्याची मागणी कंपनीचे संचालक असलेल्या शाहू खैरे यांनी केली आहे.
स्मार्ट सिटीतील अभियंत्यांना मुळातच या भागातील गटारींची माहिती नाही. तसेच महापालिकेच्या अभियंत्याचा आणि कंपनीच्या अभियंत्याचा समन्वय नाही. त्यामुळे गोंधळ उडण्याची शक्यता आहे. मुळातच या मार्गाच्या खालून अनेक नाले जात आहेत. भद्रकाली पंपिंग स्टेशन येथील काही नाले याच भागातून पुढे सरस्वती नाल्याला मिळतात आणि पुढेही अनेक नाले मिळतात. आता पावसाळा सुरू असताना अशाप्रकारचे काम सुरू केल्यानंतर पाणी साचून अनेक दुकानदार आणि नागरिकांचे नुकसान होऊ शकते. त्यामुळे महापालिका, स्मार्ट सिटी कंपनीचे संचालक आणि लोकप्रतिनिधी यांची एकत्रित बैठक झाल्याशिवाय कोणत्याही प्रकारे काम सुरू करू नये, अशी मागणी खैरे यांनी केली आहे.
शहरात मेनरोडसारख्या भागात पाणी साचत असल्याने स्मार्ट सिटी कंपनीने गटारीचे काम हाती घेतले. मात्र काम सुरू झाल्यानंतर अवघ्या काही दिवसांतच काम बंद झाले. बाजारपेठेतूनच विरोध होत असल्याचे कंपनीच्या वतीने सांगण्यात आल्यामुळे व्यापारी बुचकळ्यात पडले आहेत.

पालकमंत्री छगन भुजबळ यांनी अलीकडेच या भागाची पाहणी करून या भागात पाणी साचत असल्याने तातडीने कामे करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत. त्यामुळे दोन महिन्यांत हे काम पूर्ण करण्याचा प्रयत्न असणार आहे. महापालिका आणि स्मार्ट सिटीच्या समन्वयातूनच हे काम होत आहे.
- प्रकाश थविल, मुख्य कार्यकारी अधिकारी स्मार्ट सिटी

Web Title: Opposition to village development work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.